esakal | अमेरिकेत 18 वर्षे वयावरील सर्वांना कोरोनाची लस

बोलून बातमी शोधा

अमेरिकेत 16 वर्षे वयावरील सर्वांना कोरोनाची लस

अमेरिकेत 16 वर्षे वयावरील सर्वांना कोरोनाची लस

sakal_logo
By
टीम ई सकाळ

वॉशिंग्टन : जगभरात सध्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. भारतातही सध्या कोरोनाची दुसऱ्या लाटेमुळे चिंतेचं वातावरण आहे. कोरोनावर सध्या औषध उपलब्ध नसलं तरीही अनेक देशांनी लशींची निर्मिती केली आहे. भारतात देखील 16 जानेवारीपासून लशीकरणास सुरवात करण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये फायझर-बायोनटेक, जानसेन आणि मॉडर्ना कंपनीच्या लशीच्या वापराला मान्यता देण्यात आली आहे. युनायटेड स्टेट्समध्ये गेल्या शनिवारपर्यंत 205,871,913 डोस देण्यात आले आहेत. अमेरिकेमध्ये आता वय वर्षे 16 आणि त्यावरील सर्वांना कोरोना लशीकरणासाठी मान्यता देण्यात आली आहे. अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल एँड प्रीव्हेन्शनने याबाबतची काल सोमवारी माहिती दिली आहे.

हेही वाचा: 18 वर्षांवरील सर्वांना लस; नोंदणी कशी कराल?

हेही वाचा: Big Breaking: 18 वर्षांवरील सर्वांना देणार कोरोना लस

भारतातही 18 वर्षे वयावरील लोकांना मान्यता

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 18 वर्षापुढील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. त्यामुळे 1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनावरील लस मिळण्यास सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डॉक्टर्ससोबत बैठक घेतली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संक्रमणांच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर होता. भारतात आतापर्यंत 15.3 दशलक्ष रुग्ण आढळले आहेत. मात्र, अद्यापही अमेरिकाच याबाबत पहिल्या क्रमांकावर आहे.अमेरिकेत आतापर्यंत एकूण 31.8 दशलक्ष रुग्ण सापडले आहेत. मात्र, सध्या भारतातील कोरोना संक्रमणाचा दर सर्वाधिक आहे. भारतात दररोज जवळपास अडीच लाख रुग्ण आढळत आहेत. तर अमेरिकेत सध्या 80 हजारच्या आसपास रुग्ण सापडत आहेत.