esakal | भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष दोषी; निकोलस सरकोजी यांना एका वर्षांची कैद

बोलून बातमी शोधा

france}

या प्रकरणातील ते एक प्रमुख आरोपी आहेत.

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष दोषी; निकोलस सरकोजी यांना एका वर्षांची कैद
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पॅरिस : फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सरकोजी यांना एका स्थानिक न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोपी ठरवून एक वर्षांची कैद आणि दोन वर्षांसाठी निलंबणाची कारवाई केली आहे. 66 वर्षीय सरकोजी 2007 पासून 2012 पर्यंत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते. न्यायालयाने सरकोजी यांना 2014 मधील एका प्रकरणामध्ये मॅजिस्ट्रेटवर अवैध पद्धतीने प्रभाव टाकून खाजगी हेतूसाठी उपयोग करण्याच्या आरोपाखाली ही शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील ते एक प्रमुख आरोपी आहेत.

हेही वाचा - नोमॅडलँडच्या च्लोईना गोल्डन ग्लोब पुरस्कार 

न्यायालयाने म्हटलं की, सरकोजींना त्यांच्याच घरामध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेसलेटसोबत कैद करण्यासाठी अर्ज करण्याची परवानगी असेल. माजी राष्ट्राध्यक्षांच्या विरोधातील आरोपांमध्ये तथ्य असून हे प्रकरण गंभीर आहे. त्यांनी खाजगी हितासाठी आपल्या प्रतिष्ठेचा वापर केला आहे. मॅजिस्ट्रेटकडून त्यांनी अवैध रित्या मदत घेतली आहे. शिवाय त्यांना एक माजी वकील म्हणून या बेकायदेशीर कृत्याबाबतची पूर्ण जाणीव होती. सरकोजी यांच्या दोन वकीलांना देखील या प्रकरणामध्ये दोषी ठरवलं गेलं आहे. तसेच त्यांना देखील सरकोजी यांच्याच प्रमाणे शिक्षा सुनावली गेली आहे. 

हेही वाचा - भूमिगत अण्वस्त्र केंद्रांसाठी चीनचा डाव

सरकोजी यांना या महिन्यात आणखी एका खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. या महिन्याच्या अखेरीस सरकोजी यांच्यासहित 13 इतर लोकांना आणखी एका खटल्याचा सामना करावा लागणार आहे. सरकोजी यांच्याविरोधात 2012 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या दरम्यान अवैध पद्धतीने पैसे गोळा केल्याचा आरोप ठोठावण्यात आला आहे.