Mocha Cyclone : 'मोचा' चक्रीवादळाचा नेमका अर्थ काय? याचा कॉफीशी काही संबंध आहे का?

गेल्या काही दिवसांपासून म्यानमार आणि बांगलादेशमध्ये 'मोचा' चक्रीवादळाने थैमान घातलंय
Mocha Cyclone
Mocha Cyclone esakal

Mocha Cyclone : गेल्या काही दिवसांपासून म्यानमार आणि बांगलादेशमध्ये 'मोचा' चक्रीवादळाने थैमान घातलंय. सुमारे 20 लाख लोकांना याचा फटका बसल्याचा अंदाज आहे. लाखो लोक बेघर झालेत. ताशी 200 ते 250 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मुसळधार पाऊस पडत असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व घरे, दुकाने, मॉल इत्यादींचे नुकसान झाले आहे. पण या चक्रीवादळाला 'मोचा' हे नाव कसं पडलं?

Mocha Cyclone
Stone River : जगातील एकमेव नदी जिथे पाण्याऐवजी वाहतात दगड

वास्तविक, जगभरातील चक्रीवादळांची नावे प्रादेशिक विशेष हवामान केंद्रांच्या (RSMC) सूचनेनुसार ठेवण्यात येतात. RSMC आणि IMD (भारतीय हवामान विभाग) या दोन्ही संस्था मिळून चक्रीवादळांच्या नावांवर शिक्कामोर्तब करतात. आयएमडीमार्फत जवळपास 12 देशांना नावांचे पर्याय दिले जातात. यामध्ये बांगलादेश, म्यानमार, येमेन, पाकिस्तान, श्रीलंका आदी देश सामील आहेत.

Mocha Cyclone
No Makeup Look : वट सावित्रीच्या दिवशी असा करा नो मेकअप लूक

'मोचा' म्हणजे काय?

वास्तविक या चक्रीवादळाचं नाव 'मोचा' एका शहराच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. हे येमेन मधील प्रमुख शहर असून मोचाला अरबीमध्ये अल-मुखा, मोखा किंवा मुखा असेही म्हणतात. हे नैऋत्य येमेनमधील बंदराचं ठिकाण आहे. शिवाय एक प्रमुख व्यापारी केंद्र देखील आहे. येथून आयात-निर्यातीचे मोठे उद्योग जगभर चालतात.

Mocha Cyclone
Beauty Pageants : सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? मानुषी छिल्लरने सांगितल्या 'या' गोष्टी

मोचा' चा इतिहास

हे शहर मुस्लिम चालीरीतींसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या शहराची स्थापना 14 व्या शतकात झाली. या शहराची स्थापना शेख शादिली नावाच्या व्यक्तीने केली. अरबस्तानमध्ये कॉफी प्यायला सुरुवात करणाऱ्या व्यक्तींमध्ये शेख शादिली यांचं नाव घेतलं जातं.

Mocha Cyclone
Pasang Dawa Sherpa : माऊंट एव्हरेस्ट 26 वेळा सर करणारा 46 वर्षीय नेपाळी शेर्पा

17 व्या शतकापासून ते एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून उदयास आलं. भारतीय व्यापारीही येथे नियमित येऊ लागले. हे व्यापारी येमेनी कॉफीचा व्यापार करायचे. पुढे इजिप्शियन व्यापारीही येथे येऊ लागले.

Mocha Cyclone
कामावर जायला उशीर..गं वाट माझी बघतोय रिक्षावाला..Sara Ali Khan

कॉफीसाठी प्रसिद्ध

'मोचा' हे जगातील कॉफी उत्पादन केंद्र म्हणून ओळखले जाते. 15 व्या शतकापासून इथून युरोपीय आणि मध्य पूर्वेतील बाजारपेठेत कॉफीची निर्यात सुरू झाली. हे अरेबियाचे मुख्य कॉफी-निर्यात केंद्र म्हणून फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे.

Mocha Cyclone
Esha Gupta : चाल तुझी तुरुतुरु अन् केस उडती वाऱ्यावर भुरुभुरू...

'मोचा' म्हणजे काय?

जगभरात 'मोचा'चा वेगवेगळा अर्थ लावला जातो. परंतु प्रत्येक स्पष्टीकरणात एकदा गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे चॉकलेट पावडर. ही पावडर दूध किंवा मलईमध्ये मिसळली जाते. आणि कॉफी म्हणून सर्व्ह केली जाते.

Mocha Cyclone
Esha Deol : गोल्डन गर्लचा अंदाज पाहा कसा आहे तो...

मोचा' म्हणजे चांगल्या प्रतीची कॉफी. ही कॉफी विशिष्ट बीनपासून बनवली जाते. कॉफी अरेबिका नावाच्या वनस्पतींच्या प्रजातीपासून या बीन्स तयार होतात. या प्रकारची कॉफी फक्त मोचा, येमेनमध्ये घेतली जाते. यामध्ये कॉफी आणि चॉकलेटच्या मिश्रणाची चव खूप प्रसिद्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com