नायजेरियातील बेकायदेशीर तेल कारखान्यात स्फोट; १०० हून अधिक ठार

Explosion in Nigeria hundred people died
Explosion in Nigeria hundred people diedExplosion in Nigeria hundred people died

दक्षिण नायजेरियातील (Nigeria) इमो राज्यातील बेकायदेशीर तेल शुद्धीकरण कारखान्यात (oil refining factory) मोठा स्फोट (Explosion) झाला आहे. या स्फोटात शंभराहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर येत आहे. सरकारी मालकीच्या एग्बेमा येथील बेकायदेशीर तेल शुद्धीकरण कारखान्यात रात्री उशिरा स्फोट झाला, असे इमोचे पेट्रोलियम संसाधन आयुक्त गुडलक ओपिया यांनी सांगितले. (Explosion in Nigeria hundred people died)

नायजेरियन अधिकाऱ्यांनी या स्फोटात १०८ हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. तसेच अनेक जण गंभीर जखमीही झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पेट्रोलियम अधिकारी ओपियो यांच्या म्हणण्यानुसार, अचानक झालेल्या स्फोटामुळे (Explosion) कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही.

Explosion in Nigeria hundred people died
प्रशांत किशोर दोन दिवसांपासून हैदराबादमध्ये; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुक्काम

स्थानिक अधिकारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना परिसरात सर्वत्र विखुरलेले, जळलेले मृतदेह (died) आढळले. बेकायदेशीर तेल शुद्धीकरण कारखान्याच्या संचालकाला सरकारने यापूर्वीच फरारी घोषित केले आहे. ऑपरेटर पोलिसांपासून वाचण्यासाठी आधीच फरार आहे.

तेल कंपन्यांच्या मालकीच्या (oil refining factory) पाइपलाइनमधून कच्चे तेल चोरून अशा बेकायदेशीर तेल शुद्धीकरण कारखाने चालवले जातात. हे रिफायनरीमधून साफ ​​केल्यानंतर सुधारित टाक्यांमध्ये गोळा केले जातात. नायजेरियामध्ये (Nigeria) तेल पाइपलाइनमध्ये छेडछाड आणि तेल चोरीच्या घटना घडत असतात. त्यामुळे अनेकवेळा मोठे अपघात घडत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com