Marital Affair : तुमच्या अहोंना रंगेहाथ पकडायचंय? तिला बोलवा, फक्त... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marital affair

Marital Affair : तुमच्या अहोंना रंगेहाथ पकडायचंय? तिला बोलवा, फक्त...

Marital Affair : स्त्री असो की पुरुष जेव्हा एकमेकांची फसवणूक करू लागतात आणि दुसर्‍याशी प्रेमसंबंध ठेवू लागतात तेव्हा नात्यामध्ये कटुता येऊन दोघेही एकमेकांपासून दूर जाऊ लागतात.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

हेही वाचा: Love Affairs : लग्नाआधीचं अफेअर पार्टनरला सांगावं का?

मात्र, अशा नात्यात समस्या तेव्हा निर्माण होते. ज्यावेळी तुमच्या अफेअरबाबत तुमच्या पार्टनरला काहीच माहिती नसते. लग्न होऊनही अफेअर करणाऱ्यांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरूषांची संख्या अधिक आहे. मात्र, आता असे काही करणाऱ्या पुरूषांचा भांडाफोड करण्याचा विडा एका महिलेने उचलला आहे.

हेही वाचा: मलायका अरोराचे 'मराठी अफेअर'? रोमान्स करताना व्हिडीओ झाला व्हायरल

डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहणारी 30 वर्षीय मॅडलीन स्मिथ तिच्या सौदर्याचा वापर पुरुषांचं खरं रुप जाणून घेण्यासाठी करते. या कामासाठी स्मिथ महिलांकडून केवळ २५०० हजार फिस घेते.

हेही वाचा: शिल्पाच्या पतीचा खुलासा; "पहिल्या पत्नीचं मेहुण्यासोबत होतं अफेअर"

सेवेसाठी करते २५०० चार्ज

पुरूषांचे अफेअर आहे की नाही हे तपासण्यासाठी स्मिथ या कामासाठी अडीच हजार शुल्क घेते. पुरूषांकडून खरं कसं जाणून घ्यायचं याचं गुपित मला चांगलं माहिती असल्याचे स्मिथ सांगते. अशा स्वरूपाचे काम करण्याची प्रेरणा चीटर नावाच्या टीव्ही शोमधून मिळाल्याचं ती सांगते. त्यानंतर २०१८ पासून तिने पुरूषांच्या अफेअरचे स्टिंग ऑपरेशन करण्याच्या कामाला सुरूवात केली. आजपर्यंत स्मिथने १० हजार पुरुषांची लफडी उघडकीस करून त्यांचा भांडाफोड केले आहे.