मलायका अरोराचे 'मराठी अफेअर'? रोमान्स करताना व्हिडीओ झाला व्हायरल

मलायका अरोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
Malaika Arora
Malaika AroraInstagram

मलायका अरोरा(Malaika Arora) म्हणजे बॉलीवूडची स्टायलिश वूमन. सुंदर,सेक्सी,हॉट अशी विशेषणं वयाची पन्नाशी गाठायला आली असली तरी मलायकाच्या बाबतीत मात्र फिट बसतात. मलायका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी अर्जुन कपूरसोबतच्या नात्याला घेऊन तिला ट्रोल केलं जातं तर कधी तिच्या फॅशनवरुनही तिला नको नको ते सुनावलं जातं. आता पुन्हा मलायका चर्चेत आलीय ती एका वेगळ्याच कारणामुळे. सध्या तिचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे,त्यात ती एका मराठमोळ्या मुलासोबत रोमान्स करताना दिसत आहे. कोण आहे तो मराठी मुलगा? काय आहे त्या व्हिडीओमागचं रहस्य?

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे मराठी बिग बॉस २ चा विजेता शिव ठाकरे याच्याकडून. त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर त्यानं तो शेअर केला आहे. यात तो आणि मलायकासोबत एका रोमॅंटिक गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. राजस्थानमध्ये जसे महाल दिसतात तसंच काहीसं बॅकग्राऊंड ते डान्स करताना त्यांच्या सभोवताली दिसत आहे. मलायकानं पिवळ्या रंगाचा फ्लोअर टच गाऊन घातलाय,आणि त्यावर फ्लोरल जॅकेट तिनं परिधान केलं आहे. शिवनेही तिच्या जॅकेटला परफेक्ट मॅच होईल असा कोट परिधान केला आहे. या गाण्यात मलायकाला पाहून तिच्यासमोर गुडघ्यावर बसणारा शिव ठाकरे भलताच रोमॅंटिक मूडमध्ये दिसत आहे. त्याला पाहून मलायकानंही फ्लाईंग किस देत त्या रोमान्टिक वातावरणाला चारचॉंद लावले आहेत. शाहरुख-दीपिकाच्या 'ओम शांती ओम' सिनेमातील रोमॅंटिक गाण्यावर हे दोघे डान्स करतायत. हा व्हिडीओ शिवने पोस्ट केल्यावर भलताच व्हायरल झालाय.

Shiv Thakare, Malaika Arora
Shiv Thakare, Malaika AroraGoogle

शिव ठाकरे सोबत मलायकाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. शिवला हिंदी म्युझिक अल्बमसाठी ब्रेक मिळाला आहे का की मलायकानं एखाद्या मराठी सिनेमात शिव सोबत खास गाणं शूट केलं आहे. ती मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतेय का वगैरे वगैरे. आता जोपर्यंत हा व्हिडीओ पोस्ट करणारा शिव ठाकरे काही माहिती सांगत नाही तोपर्यंत मूळ रहस्य गुलदस्त्यातच राहणार. अर्थात तोपर्यंत उत्सुकता मात्र कायम राहणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com