Video : पाकिस्तानी Tik-Tok स्टारला जबर मारहाण!

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

एका कार्यक्रमासाठी हरीम शाह दुबईत गेली होती. त्यावेळी तेथील काही लोकांनी तिला जबर मारहाण केली.

एखाद्या कारणावरून सेलिब्रिटींना मारहाण होण्याच्या घटना नव्या नाहीत. केवळ बॉलिवूडच्या नव्हे, तर आता टिक-टॉकमुळे प्रसिद्ध झालेल्या अनेक स्टार्समंडळींनादेखील मारहाण होण्याच्या घटना समोर येत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

टिक-टॉकवर प्रसिद्ध असलेली पाकिस्तानी स्टार हरीम शाह एका कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच तिला मारहाण झाल्याची घटना घटली आहे. एका कार्यक्रमासाठी हरीम शाह दुबईत गेली होती. त्यावेळी तेथील काही लोकांनी तिला जबर मारहाण केली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होतो आहे.  

- अणुबॉम्ब हल्ल्यातही बचावल्या होत्या 'त्या' दोन इमारती... काय आहे त्यामागचे रहस्य

दुबईत एका मॉलच्या उद्घाटनासाठी ती दुबईत गेली होती. त्यावेळी तिच्यासोबत काय घटले, याबाबतची माहिती स्वत: हरीमने ट्विटरवरून सांगितली आहे. ती म्हणाली, 'मी दुबईत ओअॅसिस मॉलच्या उद्घाटनासाठी गेले होते. त्यावेळी तेथील अनेक पाकिस्तानी तरुणांनी मला धक्काबुक्की केली. मला अर्वाच्च भाषेत बोलले, तर काहींनी मला लाथा मारल्या.' तुम्ही तुमच्या घरातील महिलांशी असेच वर्तन करता का? असा सवालही तिने उपस्थित केला आहे.

- सावधान : ऑस्ट्रेलियाची होरपळ; जागतिक तापमानवाढीची घंटा

महिलांसोबत अशा घटना घडणे हे नवे नाही. पाकिस्तानात तर अशा घटना राजरोसपणे घडत असतात. या अगोदरही माझ्यासोबत काही तरुणांनी फोटो घेण्याचा बहाणा करून माझ्याशी गैरवर्तन केले होते. एकाने तर माझा हात पकडून माझ्याशी अश्लिल वर्तन केले होते, अशी माहिती तिने एका मुलाखतीमध्ये दिली.

- 'आयसीयू'मधील 'लव्ह मॅरेज' एक प्रेमकथा...

गेल्या दोन महिन्यांपासून हरीम नेहमी चर्चेत राहिली आहे. त्या अगोदर तिने पाकिस्तानच्या फॉरेन अफेअर्स कमेटीच्या रुममध्ये एक व्हिडिओ बनविला होता. त्यामुळे ती वादात अडकली होती. अशा महत्त्वाच्या ठिकाणी हरीमला टिक-टॉक व्हिडिओ बनविण्याची परवानगी कशी काय दिली गेली? असा सवाल तेथील नागरिकांनी उपस्थित केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fans beaten up Pakistani Tik-Tok star Hareem Shah in Dubai