'आयसीयू'मधील 'लव्ह मॅरेज' एक प्रेमकथा...

वृत्तसंस्था
Wednesday, 18 December 2019

अतिदक्षता विभागातील (आयसीयू) मधील एका प्रेम विवाहाची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघांमधील प्रेम पाहून अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

पिटसबर्ग (अमेरिका): अतिदक्षता विभागातील (आयसीयू) मधील एका प्रेम विवाहाची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघांमधील प्रेम पाहून अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

Video: बायकोने 'त्या' दिवशी सजवला 'असा' बेड अन्...

मॅट शिलिंग (वय 47) व ऍमी हार्वे या दोघांचा प्रेम विवाह. दोघांना एक मुलगाही आहे. पण, दोन महिन्यांपू्र्वी मॅटची तब्बेत अचानक खालावली व त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याची पत्नी त्याची देखभाल करत होती. उपचारानंतर तो शुद्धीवर आला. पण, त्याला पूर्वीचे काही आठवत नव्हते.

नवरी म्हणाली, आत्ताच्या आत्ता थांबवा लग्न...

पत्नीसह डॉक्टरांनी त्याला खूप काही आठवणी सांगण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला काहीच आठवत नव्हते. पत्नी व मुलाली ओळखत नव्हता. सर्व प्रयत्न करून झाल्यानंतरही पत्नीला तो ओळखू शकत नव्हता. पत्नी व डॉक्टरांनी एक प्रयोग करण्याचे ठरवले. 'आयसीयू'मध्ये दोघांचा पुन्हा विवाह करण्याचे नियोजन केले. ऍमीने त्याला प्रपोज करताना मला तू आवडत असल्याचे सांगून विवाह केला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी ऍमीवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तिचे निख्खळ प्रेम दिसून येते, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.

बास, मी आता जगूच शकत नाही...

मॅट एक नव्या आयुष्याला सुरवात करत असून, त्याला लवकरच आठवेल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. पण, यासाठी त्याच्या पत्नीची मोठी साथ आहे. तिचे त्याच्यावरील प्रेम दिसून आले, अशी माहिती डॉक्टर राज पद्मनाभन यांनी दिली.

पत्नी म्हणाली, तू फक्त नावाला नवरा म्हणून राहा...

कॉलेज जीवनापासून दोघे एकेमेकांचे मित्र आहे. पुढे त्यांनी विवाह केला. तिने दोघांची छायाचित्रे त्याच्या खोलीत लावली असून, त्याची काळजी घेत आहे. दरम्यान, 'आयसीयू'मधील 'लव्ह मॅरेज'वर नेटिझन्स शुभेच्छा देत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: love and marriage in icu news viral