Video: पाकिस्तानात रस्त्याच्या उद्घाटनाला आले परराष्ट्रमंत्री अन् लोक केकसाठी तुटून पडले

टीम ई-सकाळ
Monday, 8 February 2021

कुरेशी यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल व्हायला वेळ लागला नाही.

कराची : बाता मारणारे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी आपल्या वक्तव्यांमुळे वारंवार चर्चेत असतात. भारताला वारंवार नावं ठेवणाऱ्या प्रमुख पाकिस्तानी चेहऱ्यांमध्ये कुरेशी आघाडीवर आहेत. भारतविरोधी त्यांनी केलेली वक्तव्य सोशल मीडियात वादळ उठवून जाणारी ठरली आहेत. आताही कुरेशी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. 

त्याचं झालं असं की, कुरेशी एका कार्यक्रमानिमित्त मुलतानमध्ये गेले होते. यावेळी कुरेशी यांच्या हस्ते एका रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त एक मोठा केक ऑर्डर करण्यात आला होता. आणि हा केक कट करण्यासाठी कुरेशींना बोलावण्यात आले होते. 

रिहाना, ग्रेटा, मियाँनंतर शेतकऱ्यांवर बोलणारी अमांडा सर्नी आहे तरी कोण?

पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसची लाट असतानाही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत लोक जमा झाले होते. उपस्थितांमध्ये कुरेशींच्या चाहत्यांची संख्याही मोठी होती. कुरेशींनी केक कापताच त्याठिकाणी मोठा गोंधळ उडाला. कार्यक्रमाला उपस्थित लोकांनी केक खाण्यासाठी झुंबड उडाली होती. वाट मिळेल तशी लोक केक खाण्यासाठी धडपड करताना दिसून आले. हातात बसेल तेवढा केक घेऊन जाणारे लहान-मोठे पाकिस्तानी नागरिक सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.

Video: म्यानमारमध्ये काय घडतंय आणि का?

कुरेशी यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल व्हायला वेळ लागला नाही. आतापर्यंत तीन हजारहून अधिक नेटकऱ्यांनी या व्हिडिओला पसंती दिली आहे. तसेच कुरेशींना सल्ला द्यायलाही नेटकरी विसरले नाहीत.

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fight erupts over cake after Pakistani foreign minister Shah Mehmood Qureshi in Multan