रिहाना, ग्रेटा, मियाँनंतर शेतकऱ्यांवर बोलणारी अमांडा सर्नी आहे तरी कोण ?

amanda cerny.jpg
amanda cerny.jpg

भारतातील शेतकरी आंदोलनावर विदेशातील सेलिब्रिटिंनी टि्वट केल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. पॉप स्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि पूर्वाश्रमीची पॉर्नस्टार मियाँ खलिफा यांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य करताच, भारतातील बहुतांश सेलिब्रिटिंनी त्यांना विरोध केला आहे. टीका झाल्यानंतरही विदेशातील या सेलिब्रिटिंनी आंदोलनावर आपले मत व्यक्त करणे सुरुच ठेवले आहे. या आंदोलनाला विदेशातून पाठिंबाही वाढत चालला आहे. रिहाना, ग्रेटा, मियाँबरोबर आणखी एक यूट्यूब सेलिब्रिटी सध्या चर्चेत आहे. अमांडा सर्नी हे तिचं नाव असून सध्या शेतकरी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यामुळे ती चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. अमांडा सर्नीने व्हिडिओ शेअर करत शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दिला आहे. जर तुम्ही काही खात असाल तर त्यासाठी शेतकऱ्यांना धन्यवाद म्हणा, असे टि्वट तिने केले होते. अमांडा आपल्या सौंदर्यासाठी तर प्रसिद्ध आहेच. शिवाय ती लोकांच्या मदतीसाठी सदैव तयार असते. सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणाऱ्या अमांडाविषयी आपण जाणून घेऊयात. 

अमांडा सर्नी इन्स्टाग्रामवरही प्रचंड लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. टि्वटरवर तिचे 6,94,000 आणि इन्स्टाग्रामवर 1,23,00000 फॉलोअर्स आहेत. तिच्या यूट्यूब चॅनेलचे 1,360,407 सबस्क्रायबर आहेत. 

2011 मध्ये अमांडाने प्ले बॉय मिस ऑक्टोबर किताब पटकावला होता. तिच्या एका मित्राने प्ले बॉयसाठी बिकिनीवरील फोटो पाठवण्याची आयडिया दिली होती. तेव्हापासून सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांच्या संख्येत वाढच होऊ लागली आहे. 

अमांडाचे भारतीय कनेक्शन
29 वर्षीय अमांडाचा जन्म पिट्सबर्गमध्ये झाला. तिने आतापर्यंत 3000 हून अधिक स्केचेस आणि म्युझिक व्हिडिओ बनवले आहेत. अमांडा ही स्वतःला मॉडेल, अभिनेत्री, हेल्थ आणि वेलनेस विषयावर लिहिणारी लेखिका म्हणवते. ती 2019 पासून यूनोची एन्व्हायरमेंट आणि वाइल्ड लाइफ ऍम्बेसेडर आहे. तिने भारतीय युट्यूबर भुवन बामबरोबर 2018 मध्ये काम केले होते. भुवन हा 'बीबी की वाइन्स' या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये भुवन एकाच स्केचमध्ये वेगवेगळ्या पात्रांची भूमिका साकारतो.

अमांडा ही बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सारखी दिसते. जॅकलिन आणि अमांडाची 2018 मध्ये भेट झाली होती. दोघांनी एकत्रित 2020 मध्ये 'फिल्स गुड' पॉडकॉस्टचे होस्टिंगही केले होते. याच्या पहिल्या भागात सैफ अली खानही होता. 2019 मध्ये तिने भारताला भेट दिली होती. मुंबईतील युट्यूब फॅनफेस्ट या कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. जॅकलिन फर्नांडिसने दिलेल्या निमंत्रणावरुन ती त्यावेळी भारतात आली होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com