esakal | लस घेतली नाही, तर जॉब पण नाही; 'या' देशात करण्यात आलाय कडक नियम
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

लस घेतली नाही, तर जॉब पण नाही; 'या' देशात करण्यात आलाय कडक नियम

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी फिजी देशाच्या सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. फिजी देशामध्ये या महासंकटातून बाहेर पडण्यासाठी पंतप्रधान फ्रँक बैनीमरामा यांनी एक महत्त्वाचा असा नारा दिला आहे. त्यांनी 'नो जॅब्स, नो जॉब्स' असा महत्त्वपूर्ण नारा देत लसीकरणाचं महत्त्वप अधोरेखित केलं आहे. बेनीमरामा यांनी म्हटलंय की, लस न घेणाऱ्यांना आपल्या नोकरीला मुकावं लागेल. त्यांनी म्हटलंय की, कोरोनापासून वाचण्यासाठी लस घेणं जरुरी आहे आणि जो नागरिक लस घेणार नाही त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. फिजी देशामध्ये डेल्टा व्हेरियंटचा धुमाकूळ सुरु आहे.

हेही वाचा: अन् बोलता बोलता पंकजा मुंडेंचे डोळे पाणावले...

पंतप्रधान फ्रँक बॅनीमारामा यांनी म्हटलंय की, 15 ऑगस्टपर्यंत जर लसीचा पहिला डोस घेतला नाही तर सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं जाईल आणि 1 नोव्हेंबरपर्यंत दुसरा डोस न घेतल्यास त्यांना बरखास्त केलं जाईल. सरकारने कंपन्यांना म्हटलंय की लसीकरणाप्रती निष्काळजीपणा दाखवल्यास नोकरीला मुकावं लागेल. खासगी कर्मचाऱ्यांसाठी ही डेडलाईन एक ऑगस्टपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा: भास्कर जाधव यांना विधानसभा अध्यक्षपद मिळणार ?

कंपन्यांना सूचना

कर्मचाऱ्यांशिवाय फिजी सरकारने कंपन्यांना देखील इशारा दिला आहे. ज्या कंपन्यांच्या अधिकतर कर्मचाऱ्यांनी अद्याप लस घेतली नाहीये, अशा कंपन्यांना बंद करण्याची धमकी सरकारने दिली आहे. यासंदर्भात गुरुवारी देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी म्हटलंय की, नो जॅब्स, नो जॉब्स! विज्ञान आपल्याला सांगतं की कोरोनापासून वाचण्यासाठी लस किती उपयोगी आहे ते. त्यामुळे लस न घेणाऱ्यांना महागात पडणार आहे.

loading image