esakal | ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवादी अफगाणिस्तानचा गृहमंत्री, भारताला मानतो शत्रू
sakal

बोलून बातमी शोधा

‘मोस्ट वाँटेड’ दहशतवादी अफगाणिस्तानचा गृहमंत्री

‘मोस्ट वाँटेड’ दहशतवादी अफगाणिस्तानचा गृहमंत्री

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Taliban Government in Afghanistan : अफगाणिस्तानवर पूर्णपणे ताबा मिळविल्यानंतर तालिबानने मंगळवारी आपल्या हंगामी सरकारची घोषणा केली. मुल्ला मोहंमद हसन अखुंद याच्याकडे सरकारची सूत्रे असणार आहेत. त्याला हंगामी पंतप्रधानपद देण्यात आले आहे. तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिदने या नव्या सरकारची माहिती दिली. त्यानुसार, हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेच्या संस्थापकाचा मुलगा सिराजुद्दीन हक्कानी याच्याकडे गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अमेरिकेने त्याला ‘मोस्ट वाँटेड’च्या यादीत टाकले होते. तसेच भारतीय दूतावासावरील हल्ल्यामागेही त्याचा हात होता.

तालिबानच्या हंगामी सरकारमधील मंत्रिमंडळावर गेली वीस वर्षे संघटनेवर वर्चस्व मिळविलेल्यांची वर्णी लागली आहे. अमेरिकेबरोबर चर्चेत सहभागी झालेला आणि सैन्यमाघारीबाबत त्यांच्याबरोबर झालेल्या करारावर स्वाक्षरी करणारा मुल्ला अब्दुल घनी बरादर याच्याकडे उपपंतप्रधानपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. सिराजुद्दीन हक्कानी याच्याकडे गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सिराजुद्दीन हक्कानी याचं वय 40-50 च्या दरम्यान असल्याचं म्हटले जातेय. तो अज्ञात ठिकाणावरुन आपलं नेटवर्क चालवत असल्याचेही म्हटले जातं.

हेही वाचा: राणेंच्या वाहनावरील ड्रायव्हरचा मृत्यू; कुटुंबियांनी केले गंभीर आरोप

‘मोस्ट वाँटेड’ दहशतवादी -

अफगाणिस्तानचा गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी भारताला क्रमांक एकचा शत्रू मानतो. सिराजुद्दीन हक्कानी अमेरिकेची तपास संस्था एफबीआयच्या हिटलिस्टमध्ये आहे. अमेरिकेनं सिराजुद्दीन हक्कानी याच्यावर 5 मिलियन डॉलर म्हणजेच 36 कोटी रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे. सिराजुद्दीनचे अल कायदाशी जवळचे संबंध आहेत. देशाचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांच्या हत्येचा कट २००८ मध्ये आखण्यात आला होता, त्यातही त्याचा सहभाग होता. हक्कानी नेटवर्कवर अमेरिकेसह अनेक देशांनी बंदी घातली आहे.

हेही वाचा: तालिबानकडून सरकारची घोषणा, पाहा कसं आहे मंत्रिमंडळ?

जलालुद्दीन हक्कानी यांच्य मृत्यूनंतर त्यांचा मुलगा सिराजुद्दीन हक्कानी नेटवर्क सांभाळत आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सिमेवर हक्कानी नेटवर्क तालिबानसाठी रसद पुरवणे आणि सैन्याची देखभाल करण्याचं काम करते. काही तज्ज्ञांच्या मते, अफगाणिस्तानमध्ये हक्कानी नेटवर्कने हल्ल्याची सुरुवात केली. अफगाणिस्तानमधील अनेक हाय-प्रोफाइल हल्ल्यात हक्कानी नेटवर्कचा हात आहे.

भारतीय दूतावासावरील हल्ल्यामागेही हक्कानी नेटवर्क -

काबूलमधील भारतीय दूतावासावरील हल्ल्यामागेही हक्कानी नेटवर्कचा हात होता. 7 जुलै 2008 मध्ये भारतीय दूतावासावर हल्ला झाला होता. यामध्ये भारतीयांसोबत 58 जणांचा मृत्यू झाला होता. हक्कानीने हा हल्ला घडवून आणला होता.

loading image
go to top