Video : चिमुरडीचे ड्रम वादन पाहून भलेभले घायाळ; पाच वर्षांच्या मुलीचा व्हिडीओ झाला व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी अत्यंत बेभान होऊन सराईत वादकाप्रमाणे ड्रम वाजवत आहे.

कला ही उपजतच माणसांत असते असं म्हणतात. अगदी लहानपणापासून जोपासलेली एखादी कला आयुष्यभर आपली साथ सोडत नाही असं म्हणतात. कलेतील प्रतिभा ही वयावर कधीच अवलंबून नसते. लहान मुले जेंव्हा एखादी कला प्रतिभेने सादर करतात तेंव्हा निश्चितच आश्चर्यचकित व्हायला होतं. अशी लहानवयातील प्रतिभा पाहून चाट पडायला होतं. सोशल मीडियात असे अनेक प्रतिभावान मुलांचे व्हिडीओ व्हायरल झालेले दिसतात. हे व्हिडीओ पाहून आपल्यालाही एखादी कला जोपासावी निश्चितच वाटते. सध्या अशाच एका व्हिडीओची चलती आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी अत्यंत बेभान होऊन सराईत वादकाप्रमाणे ड्रम वाजवत आहे. तीचं हे ड्रम वाजवणे इतके प्रभावी आहे की ती एखाद्या प्रोफेशनल ड्रम वादकाप्रमाणे भासत आहे. ही चिमूरडी अवघी पाच वर्षांची आहे. मात्र तीची कला भल्याभल्यांना लाजवेल, अशी आहे. 

हेही वाचा - कोरोनाचा मज्जासंस्थेवरही होऊ शकतो परिणाम; मेंदूत न भरुन येणारे होऊ शकते नुकसान

संगीत हा प्रांतही तसाच आहे. संगीत वयाच्या कोणत्याही टप्प्यावर भूरळ पाडू शकते. अनेक जण आपलं आयुष्य संगीताच्या आराधनेत व्यतीत करतात. लहानपणापासून सुरु केलेली ही आराधना अगदी मरेपर्यंत सुरु राहते. या लहान मुलीचा हा व्हिडीओ देखील याचदृष्टीने प्रचंड आश्वासक आहे. या व्हिडीओला लाखो लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत. 

या मुलीचा हा ड्रम वाजवतानाचा व्हिडीओ एका सुप्रसिद्ध अमेरिकन खेडाळूने शेअर केला आहे. अमेरिकेचा बास्केटबॉलपटू असलेल्या रेक्स चॅपमॅनने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ इतका प्रभावी आहे की तो पाहता पाहता व्हायरल झाला. हा व्हिडीओ अवघ्या एक मिनिटाचा आहे. या व्हिडीओत ही चिमुरडी एका ड्रम सेटसमोर बसली आहे. ती ड्रम वाजवण्याच्या तयारीच्या पवित्र्यात आहे. जसे संगीत सुरु होते तसे ती आपली कलाकारी दाखवायला सुरु करते. ती ज्या कुशलतेने हा वादन करते ते पाहून भाळून जायला होतं. लहान मुलीच्या एकदम प्रभावी अशा सादरीकरणाने कलेबाबतचा आदर द्विगुणित तर होतोच शिवाय त्या मुलीबाबतही प्रेम उफाळून येते. हे वादन करताना त्या मुलीच्या चेहऱ्यावरचे भावदेखील आश्वासक आणि आत्मविश्वासू आहेत. 

हेही वाचा - पाकिस्तानमध्ये काश्मीरवर सुरु होती Online मीटिंग, हॅकर्सनी दिला 'जय श्रीराम'चा नारा

ट्विटरवर याला ५.४ लाख व्ह्यूज मिळाले आहे तर १७,२००हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. इंटरनेट युजर्स मुलीचे हे कौशल्य पाहून हैराणच झाले. एका युजरने लिहिले की मी नेहमीच म्हणत आलोय की मुलांना खेळणी नव्हे तर योग्य वाद्य दिले पाहिजे. हा काही चमत्कार नाही. मुलांना जेव्हा योग्य उपकरणे त्यांच्या हातात भेटतात तेव्हा ते या गोष्टींकडे वळतात. एका अन्य युजरने लिहिले की सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मुलांना हे आवडते हे चांगल आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five year old girl playing drum viral video on social media