esakal | कोरोनाचा मज्जासंस्थेवरही होऊ शकतो परिणाम; मेंदूत न भरुन येणारे होऊ शकते नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

brain

कोरोना व्हायरसचा मेंदूवर आणि त्याच्या कार्यक्षमतेवर काही परिणाम होतो का यासंदर्भात अलिकडेच एक अभ्यास करण्यात आला.

कोरोनाचा मज्जासंस्थेवरही होऊ शकतो परिणाम; मेंदूत न भरुन येणारे होऊ शकते नुकसान

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वॉशिंग्टन : आठ महिन्यांपूर्वी आलेल्या कोरोनाने साऱ्या जगाला चिंतेत टाकले आहे. हा व्हायरस नवा असल्याने याचे परिणामदेखील नव्या पद्धतीने समोर आले. हळूहळू याबाबतच्या उपाययोजना प्रत्यक्षात आणल्या गेल्या. मात्र, अद्यापही जग या कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येऊ शकले नाहीये. कोरोना व्हायरसची तत्कालिन दृश्य लक्षणे ही दिसतातच मात्र, याचे शरीरावर आणखी काही परिणाम होतात का याचे संशोधन सध्या सुरु आहे. 

कोरोना व्हायरसचा मेंदूवर आणि त्याच्या कार्यक्षमतेवर काही परिणाम होतो का यासंदर्भात अलिकडेच एक अभ्यास करण्यात आला. 80 हून अधिक कोविड-19 च्या रुग्णांवर केल्या गेलेल्या अभ्यासामध्ये एक तृतियांश रुग्णांच्या मेंदुच्या पुढील भागात काही जटीलता पहायला मिळाली आहे. हा अभ्यास कोरोना रोगाच्या प्रादुर्भावाचा मज्जासंस्थेवर होणाऱ्या परिणामावर प्रकाश टाकू शकतो. या अभ्यासाचा अहवाल, 'सीजर : युरोपियन जर्नल ऑफ एपिलेप्सी' मध्ये प्रकाशित झाला आहे. ईईजीच्या माध्यमातून मेंदूच्या असामान्य गोष्टींचा शोध घेण्यासाठी हे जर्नल प्रसिद्ध आहे. 

हेही वाचा - आरोग्यगाथा : तांब्यातील निखळ पाणी...

अमेरिकेच्या बेयलर कॉलेज ऑफ मेडिसिनमध्ये मज्जासंस्था विज्ञानाच्या सहाय्यक प्राध्यापक जुल्फी हनीफ यांनी म्हटलं की, आम्ही 600 हून अधिक अशा  रुग्णांना भेटलो जे या प्रकाराने प्रभावित आहेत. आधी जेंव्हा आम्ही याचे परिक्षण छोट्या समूहावर पाहिले तेंव्हा आम्ही याबाबत खात्रीपूर्ण नव्हतो मात्र हा योगायोग आहे किंवा आणखी काही, आता आम्ही खात्रीपुर्वक सांगू शकतो की याचा काहीतरी संबंध आहे. 

संशोधकांनी म्हटलं की, या अभ्यासात सामिल असणाऱ्या लोकांच्या मेंदूच्या पुढच्या भागात असामान्य गोष्टी बघायला मिळाल्या. त्यांनी म्हटलं की, कोविड-19 च्या रुग्णांमधील ईईजीमधून असे काही संकेत मिळाले की मेंदूला या पद्धतीने नुकसान होऊ शकते की या आजारातून बरे झाल्यावरही हे नुकसान भरुन निघू शकणार नाही. 

हेही वाचा - चेहऱ्याचा ग्लो वाढवायचा असेल तर झोपण्यापुर्वी करा या गोष्टी

हनीफ यांनी म्हटलं की, आपल्याला हे माहितीय की नाकावाटे हा व्हायरस शरिरात जाण्याची शक्यता ही सर्वाधिक असते. यामुळेच, मेंदुच्या त्या पुढच्या भागात परिणाम होतो जो प्रवेशापासून अधिक जवळ आहे. 

त्यांनी म्हटलं की आणखी एक गोष्ट पहायला मिळाली की, याप्रकारे प्रभावित झालेल्या लोकांचे सरासरी वय हे 61 वर्षे होते. यातील एकतृतियांश महिला होत्या तर दोन तृतियांश लोक पुरुष होते. यामधून हे लक्षात येतं की, कोरोना व्हायरसशी निगडीत मेंदूवरील  परिणाम हा वयस्कर पुरुषांवर सामान्यत: होऊ शकतो. मात्र, वैज्ञानिकांचं याबाबत अद्याप असं म्हणणं आहे की, यावर अधिक अभ्यास  होणं गरजेचं आहे. 

loading image
go to top