esakal | कोरोना जात नाही तोच ऑस्ट्रेलियात पसरतोय मांस खाणारा गंभीर आजार

बोलून बातमी शोधा

flesh eating ulcer}

ऑस्ट्रेलियातील सेंट विंन्सेट रुग्णालयात पुढील उपाचारासाठी दाखल केलं गेलं. तेव्हा अशी माहिती समोर आली की अॅडमला मांस खाणाऱ्या बुरुली अल्सर या आजाराची लागण झाली आहे. 

कोरोना जात नाही तोच ऑस्ट्रेलियात पसरतोय मांस खाणारा गंभीर आजार
sakal_logo
By
टीम ई सकाळ

सिडनी - जगात सध्या कोरोनाचा कहर असताना ऑस्ट्रेलियात आणखी एका आजाराने दार ठोठावलं आहे. ऑस्ट्रेलियातील एका तरुणाच्या टाचेला एक लाल डाग दिसू लागला होता. डाग असलेल्या ठिकाणी गेल्या तीन आठवड्यापासून त्याला त्रास होत होता. त्यानंतर तिथं छिद्रही पडलं. संबंधित व्यक्तीला मेलबर्नमधील ऑस्टिन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी  हा आजार झालेल्या अॅडम नोएल्सला सांगितलं होतं की, तो यातून लवकर बरा होईल. मात्र काही दिवसातच या आजाराने गंभीर रुप धारण केलं आणि त्याच्या त्वचेला छिद्र पडलं होतं तिथं आतलं हाड दिसू लागलं. हे छिद्र एखाद्या टेनिस बॉलच्या आकाराइतकं होतं. शेवटी अॅडमला ऑस्ट्रेलियातील सेंट विंन्सेट रुग्णालयात पुढील उपाचारासाठी दाखल केलं गेलं. तेव्हा अशी माहिती समोर आली की अॅडमला मांस खाणाऱ्या बुरुली अल्सर या आजाराची लागण झाली आहे. 

बुरुली अल्सर हा आजार बॅक्टेरियामुळे होतो. यामुळे तुमच्या शरीरात जखम होते. जर वेळेवर उपचार झाले नाही तर शरीराचे अवयव काढून टाकण्याची वेळ येऊ शकते. डॉक्टरांनी जेव्हा अॅडमला विचारलं होतं की, दिवसभर तू काय करतोस तेव्हा त्यानं सांगितलं होतं की, दररोज बागेत काम करणं, शेड तयार करणं, त्यासाठी माती उकरून काढणं, झाडं कापणं यांसारखी कामे करत होता. डॉक्टरांना त्यानंतर अॅडमच्या आजाराची माहिती समजली. झाडांवर असलेल्या पोसम्सच्या शरीरात असलेल्या बॅक्टेरियामुळे त्याची अशी अवस्था झाली. पोसम्स ही मुंगुसाची एक प्रजाती आहे. ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि आफ्रिकेच्या काही भागात ते आढळलेत. 

हे वाचा - Corona Update: आतापर्यंत 1 कोटी 21 लाख जणांना कोरोनाची लस, जाणून घ्या आकडेवारी

पोसम्स सामान्यपणे रात्रीच्यावेळी फिरतात. आता ज्या आजारामुळे अॅडमचा पाय कापण्याची वेळ आली होती त्याच आजाराने पोसम्ससुद्धा त्रस्त असतात. ज्या बॅक्टेरियामुळे बुरुली अल्सर हा आजार होतो त्याला मायक्रोबॅक्टेरियाम अल्सरान असं म्हटलं जातं. हा बॅक्टेरिया पोसम्सच्या मलमुत्रामध्ये आढळतो. पोसम्सची राहण्याची नैसर्गिक ठिकाणं नष्ट होत आहेत त्यामुळे मानवी वस्तीत ते राहत आहेत. यामुळे मानवाशी संपर्क वाढत असून पोसम्सना होणारा आजार माणसाला होत आहे. 

हे वाचा - टायगर वूड्स यांच्या कारचा भीषण अपघात

ऑस्ट्रेलिया मांस खाणाऱ्या या बुरुली अल्सरचे रुग्ण गेल्या दोन वर्षात जास्त आढळले आहेत. खरंतर बुरुली अल्सर फारसा बघायला मिळत नव्हता. मात्र 2014 मध्ये तब्बल 65 रुग्ण आढळले होते. तर 2019 मध्ये 299 तर 2020 मध्ये 218 रुग्णांमध्ये हा आजार आढळून आला होता. व्हायरॉलॉजीस्ट डॉक्टर डॅनिअल ओब्रायन सांगतात की, दर आठवड्याला मांस खाणाऱ्या आजाराचे 5 ते 10 रुग्ण व्हिक्टोरिया प्रांतात आढळतात. बुरुली अल्सर वेगाने तुमची संवेदनशील त्वचा खाण्यास सुरु करते.