इजिप्तचे माजी सर्वेसर्वा होस्नी मुबारक यांचे निधन

वृत्तसंस्था
Wednesday, 26 February 2020

मुबारक यांच्यावर किमान सहा वेळा जीवघेणे हल्ले झाले होते.

कैरो : तब्बल ३० वर्षे सत्ताधीश राहिलेले इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक (वय९ १) यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुबारक यांनी १९८१ ते २०११ या काळात इजिप्तची सत्ता सांभाळली होती. नऊ वर्षांपूर्वी त्यांना पदच्युत करण्यात आले होते. अरब क्रांतीमध्ये सहभागी झालेल्यांना ठार मारण्याचा हुकूम त्यांनी दिला होता. त्याबद्दल नंतर त्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. परंतु, २०१७ मध्ये त्यांना सोडण्यात आले.

- 'पप्पा ड्रॉइंग रूममध्ये पाहुण्यांसोबत बसले आहेत'; चेतन भगत यांचा मोदींना टोला!

मोहंमद मोरसी हे नंतर मुबारक यांचे उत्तराधिकारी झाले. लोकशाही पद्धतीने त्यांची निवड करण्यात आली होती. परंतु, त्यांनाही २०१३ मध्ये पदावरून हटविण्यात आले. 

मुबारक यांच्या कार्यकाळात बहुतेक काळ देशातील नागरिकांसाठी निर्बंधच लागू करण्यात आले होते. आणीबाणीसारखीच स्थिती होती. पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्याचीही परवानगी त्यांनी दिलेली नव्हती.

- #BoycottTakht : 'हिंदू टेररिस्ट' ट्विटमुळे उफाळला नवा वाद; लेखकाला...

मुबारक यांच्यावर किमान सहा वेळा जीवघेणे हल्ले झाले होते. ते जेव्हा १९९५ मध्ये आफ्रिकी देशांच्या शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी इथिओपियास गेले असताना त्यांच्या लिमोझीन मोटारीला लक्ष्य करण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Egyptian President Hosni Mubarak dies aged 91