'पप्पा ड्रॉइंग रूममध्ये पाहुण्यांसोबत बसले आहेत'; चेतन भगत यांचा मोदींना टोला!

वृत्तसंस्था
Tuesday, 25 February 2020

१९४७ मध्ये भारतात हिंदू-मुस्लीम याच एका गोष्टीची चर्चा सुरू होती.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक समजले जाणारे आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेले लेखक चेतन भगत यांनी राजधानीतील हिंसाचारावरून सरकारला टोला लगावला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील तीन दिवसांपासून दिल्लीत हिंसाचार सुरू असतानाच पंतप्रधान मोदींनी यासंदर्भात साधे एक ट्विटही केलेले नाही, असे मत अनेकांनी ट्विटवरून व्यक्त केले आहे.

- भारत-अमेरिकेत संरक्षण करार; शस्त्रास्त्र खरेदीवर शिक्कामोर्तब!

मोदी हे सोमवारी (ता.२५) ट्रम्प यांच्यासोबत अहमदाबादेत होते. त्यानंतर आजही दिल्लीमध्ये हिंसक आंदोलने सुरू असताना मोदी हे ट्रम्प यांच्याबरोबर बैठकीतच व्यग्र असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

यावरून चेतन भगत यांनी उपहासात्मक ट्विट केले असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, “पप्पा ड्रॉइंग रूममध्ये पाहुण्यांबरोबर बसले आहेत आणि कुटुंबातील इतर सदस्य बाजूच्या रूममध्ये मोठ्याने भांडत आहेत. हे खूप वाईट आहे.”

- '...त्यासाठी मी अमेरिकेचा अध्यक्ष राहिलो पाहिजे'; अंबानींच्या प्रश्नाला ट्रम्प यांचे उत्तर!

चेतन भगत यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''१९४७ मध्ये भारतात हिंदू-मुस्लीम याच एका गोष्टीची चर्चा सुरू होती. त्याकाळात जगभरातील इतर देशांमध्ये चांद्रमोहिम, कॉम्प्युटर, इंटरनेट, स्मार्टफोन, कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयीच्या घडामोडी घडत होत्या. आणि आता २०२० सुरू असतानाही भारतात हिंदू-मुस्लीम याच एका गोष्टीची चर्चा सुरू आहे.''   

- #BoycottTakht : 'हिंदू टेररिस्ट' ट्विटमुळे उफाळला नवा वाद; लेखकाला...

चेतन भगत यांच्याप्रमाणे बॉलिवूड क्षेत्रातील अनुराग कश्यप, अनुभव सिन्हा, स्वरा भास्कर, ऋचा चढ्ढा, हंसल मेहता यांसारखे बरेच कलाकार सोशल मीडियावर देशातील विविध घडामोडींबाबत व्यक्त होताना दिसतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Author Chetan Bhagat criticized PM Narendra Modi about Delhi riots