esakal | एका वर्षानंतर राजकारणात परतण्याची तयारी करताहेत पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ
sakal

बोलून बातमी शोधा

Nawaj Sharif image

पाकिस्तान  पीपल्स पार्टीचे अध्यक्ष जरदारी यांनी शुक्रवारी फोनवरून शरीफ यांच्याशी बातचीत केली. आणि त्यांना रविवारी होणाऱ्या विरोधी पक्षांच्या डिजीटल संमेलनात सहभागी होण्यासाठी आंमत्रण दिलं होतं. 

एका वर्षानंतर राजकारणात परतण्याची तयारी करताहेत पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री नवाज शरीफ एका वर्षाच्या मोठ्या अंतरानंतर देशाच्या राजकारणात पुन्हा परतण्याची तयारी करत आहेत. पाकिस्तान पिपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो जरदारी यांनी त्यांना इमरान खान सरकारच्या विरोधात आंदोलन सुरु करायच्या उद्देशाने रविवारी आयोजित विरोधी पक्षांच्या एका डिजीटल संमेलनात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं आहे. 

'पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज'चे प्रमुख शरीफ यांना मागील वर्षी लाहोर उच्च न्यायालयाने आजाराच्या उपचारासाठी चार आठवडे परदेशी जाण्याची परवानगी दिली होती. ज्यानंतर ते नोव्हेंबरपासून लंडनमध्ये राहत आहेत. तीनवेळा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिलेले शरीफ हे त्यांची मुलगी मरियम आणि जावाई मोहम्मद सफदर यांच्यासह सहा जुलै 2018 रोजी एवनफिल्ड संपत्ती प्रकरणात दोषी ठरवले गेले होते. 

हेही वाचा - मास्क न लावल्यामुळे पाचशेचा दंड; वकीलाने मागितली दहा लाखांची नुकसानभरपाई

शरीफ याना 2017 साली पदावरुन काढून टाकण्यात आलं होतं. डिसेंबर 2018 मध्ये त्यांना अल अजीजिया इस्पात मिलच्या प्रकरणात सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली गेली होती. या दोन्ही प्रकरणात त्यांना जामिनावर सोडण्यात आले होते. सोबतच उपचारांसाठी त्यांना लंडनला जाण्याचीही परवानगी देण्यात आली होती. 

शरीफ यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार त्यांना आठ आठवड्यात परत यायला सांगितलं होतं मात्र आरोग्याच्या कारणांमुळे त्यांना तसं करता आलं नाही. 

पाकिस्तान  पीपल्स पार्टीचे अध्यक्ष जरदारी यांनी शुक्रवारी फोनवरून शरीफ यांच्याशी बातचीत केली. आणि त्यांना रविवारी होणाऱ्या विरोधी पक्षांच्या डिजीटल संमेलनात सहभागी होण्यासाठी आंमत्रण दिलं होतं. 

हेही वाचा - विरोधकांच्या गोंधळातच राज्यसभेत कृषी विधेयक मंजूर

शरीफ यांच्या राजकीय उत्तराधिकारी म्हणवल्या जाणाऱ्या त्यांच्या मुलीने या निंमत्रणासाठी जरदारी यांचे आभार मानले आहेत. 
या संमेलनात पाकिस्तानचे इमरान खान सरकारच्या विरोधात आंदोलनात सुरु करण्याबाबतची रणनीती बनवली जाणार आहे. विरोधी पक्षांचं असं म्हणणं आहे की, खान सरकारला महगाई आणि गरीबी मिटवण्यात अपयश आलं आहे.  
मात्र, शरीफ या संमेलनात सहभागी होणारेत का याचा खुलासा अद्याप झालेला नाहीये. परंतु, पाकिस्तानातील वृत्तपत्र 'डॉन'ने शरीफ या संमेलनात सहभागी होतील, अशी माहीती दिली आहे.