esakal | फ्रान्सचा पाकला दणका; मिराज जेट-पाणबुड्यांच्या दुरुस्तीला नकार
sakal

बोलून बातमी शोधा

imran khan

फ्रान्सने कतारला सूचना दिलीय की त्यांनी पाकिस्तानी वंशाच्या टेक्निशियन्सना फायटर जेट्सवर काम करु देऊ नये.

फ्रान्सचा पाकला दणका; मिराज जेट-पाणबुड्यांच्या दुरुस्तीला नकार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पॅरिस : पाकिस्तानचे  पंतप्रधान इम्रान खान यांना फ्रान्स सरकारने आणखीन एक धक्का दिला आहे. फ्रान्सने कतारला सूचना दिलीय की त्यांनी पाकिस्तानी वंशाच्या टेक्निशियन्सना फायटर जेट्सवर काम करु देऊ नये. हे पाकिस्तानी वंशाचे टेक्निशियन काही तांत्रिक माहिती गहाळ करतील या चिंतेने फ्रान्सने ही भुमिका घेतलीय.  अलिकडेच फ्रान्सवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्यूअल मॅक्रोन यांच्या इस्लामोफोबियावरील वक्तव्यावरुन इम्रान खान यांनी टीका केली होती. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला असल्याचं बोललं जातंय. 

हेही वाचा - ट्विटर बायडेन यांच्याकडे देणार अध्यक्षीय अकाऊंटचे अधिकार

फ्रान्सने पाकिस्तानची मदत करण्यास साफ नकार दिला आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानने आपल्या मिराज फायटर जेट, एअर डिफेन्स सिस्टम आणि अगोस्टा 90 B पानबुडींना अपग्रेड करण्यासाठी मदत मागितली होती. मात्र फ्रान्सने ही मदत नाकारली आहे. अनेकांचं असं म्हणणं आहे की, पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी महम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्राला समर्थन दिल्याने टीका केली होती. यामुळेच फ्रान्सने हे पाऊल उचलले आहे. फ्रान्सने कतारला देखील सांगतिलंय की, त्यांनी पाकिस्तानी वंशाच्या टेक्निशियन्सना आपल्या फायटर जेटवर काम करु देऊ नये. कारण ते फायटर जेटच्या बाबतीतील टेक्निकल माहिती पाकिस्तानला लीक करु शकतात. हे फायटर जेट भारताच्या डिफेन्सचा महत्त्वपूर्ण भाग आहे. पाकिस्तान भुतकाळात देखील महत्त्वपूर्ण माहिती चीनसोबत शेअर करत आला आहे. 

हेही वाचा - दुबईच्या शासकाच्या पत्नीचे बॉडीगार्डसोबत अफेअर? गप्प राहण्यासाठी दिले 12 कोटी
फ्रान्सने सप्टेंबर महिन्यात 18 वर्षांच्या पाकिस्तानी वंशाच्या अली हसनने शार्ली हेब्दो नावाच्या फ्रान्सच्या मॅगझीनच्या ऑफिसबाहेर दोन लोकांवर हल्ला केला होता. त्याचे वडील पाकिस्तानात राहतात. त्यांनी एका न्यूज चॅनेलला म्हटलं होतं की, त्यांच्या मुलाने खूपच शानदार काम केलं आहे आणि ते या हल्ल्याने खूश आहेत. शार्ली हेब्दोने पैगंबर यांचे व्यंगचित्र छापले होते. फ्रान्सच्या सरकारने पाकिस्तानचे मिराज-3 आणि मिराज-5 फायटर जेटला अपग्रेड न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पाकिस्तानच्या वायु सेनेला मोठा झटका आहे. पाकिस्तानकडे फ्रेंच दसॉल्ट एव्हीएशनचे 150 मिराज फायटर जेट आहेत. यातील अर्धेच कामास पात्र राहिलेत. 


पाकिस्तानने दशकांपासून मिराज फायटर खरेदी करत आला आहे. पाकिस्तानच्या राजधानीत याच्या दुरुस्तीचं काम होतं. भारत आणि फ्रान्सच्या राजनीतीकारांनी सांगितलंय की, पाकिस्तानने अलिकडेच फ्रान्सकडे फायटर जेटला अपग्रेड करण्याची विनंती केली होती. पण पाकची ही विनंती धुडकावून लावण्यात आली आहे. पाकिस्तानच्या फ्रेंच-इटालियन एअर डिफेन्स सिस्टमलाही अपग्रेड करण्याच्या विनंतीला फ्रान्सने केराची टोपली दाखवली आहे. इम्रान खान यांनी मुस्लिम देशांच्या नेत्यांना एक खुलं पत्र लिहलं होतं. त्यात बिगरमुस्लिम देशांत वाढत्या इस्लामोफोबियाच्या विरोधात एकजूट होण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. पाकिस्तानच्या रस्त्यांवर फ्रान्सच्या विरोधात प्रदर्शने झाली होती. तसेच संसदेत पॅरिसमधून आपले राजदूत परत बोलावून घेण्याचा प्रस्ताव देखील पारित झाला होता.
 

loading image