
Sebastien Le Corneaux Resigns
ESakal
फ्रान्समध्ये गंभीर राजकीय संकट सुरू आहे. देशाचे नवे पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी नवीन मंत्रिमंडळ नियुक्त केल्यानंतर काही तासांतच राजीनामा दिला. सेबॅस्टियन यांच्या अचानक घेतलेल्या निर्णयाने अनेकांना आश्चर्य वाटले. ते राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांचेही जवळचे मानले जातात. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या कार्यालयाने सोमवारी (६ ऑक्टोबर) पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी सरकार स्थापन केल्यानंतर काही तासांतच राजीनामा दिल्याची घोषणा केली.