Video : तब्बल ४००० मीटर उंचीवरुन हॉट-एअर बलूनवर उभे राहून प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video : तब्बल ४००० मीटर उंचीवरुन हॉट-एअर बलूनवर उभे राहून प्रवास

Video : तब्बल ४००० मीटर उंचीवरुन हॉट-एअर बलूनवर उभे राहून प्रवास

एका फ्रेंच डेअरडेव्हिलने हॉट-एअर बलूनच्या वर उभे राहून उड्डाण केले आणि स्वतःचाच जुना विश्वविक्रम मोडीत काढून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. रेमी ओव्हरार्ड हा पश्चिम फ्रान्सच्या चॅटेलरॉल्ट येथे तब्बल ४०१६ मीटर (१३१७५ फूट) उंचीवरून एका महाकाय हॉट एअर बलून वर स्वार झाला. एएफपीने हे वृत्त दिले. यापूर्वी २०१९ मध्ये ओव्हरार्डनं १२१७ मीटर उंचीवरून हॉट एअर बलून प्रवास केला होता.

तथापि ओव्हरार्ड या बलूनिस्टने हे केवळ प्रसिद्धीसाठी किंवा गौरवासाठी केले नाही, त्यामागे एक उदात्त कारण होते. ओव्हरार्डचा हा स्टंट पश्चिम फ्रान्समधील टेलीथॉन मोहिमेचा एक भाग होता, ज्यातून मज्जासंस्थेसंबंधी दुर्मिळ रोगांशी संबंधित संशोधन आणि प्रसारासाठी वार्षिक निधी उभारला जाणार होता. ओव्हरर्डचं हे साहस पाहून संपूर्ण जगभरातील लोक थक्क झाले आहेत.

हेही वाचा: 'हे' 6 मिडकॅप्स शेअर्स देतील भरघोस परतावा, तुमच्याकडे आहेत का?

एका ट्विटमध्ये ओव्हरर्ड म्हणाला की, मुख्य उद्दिष्ट जमिनीपासून किमान ३६३७ मीटर उंचीवर जाणे हे होते, कारण ही उंची फ्रान्सच्या वार्षिक धर्मादाय मोहिमेचा फोन नंबर ३६-३७ दर्शवते. परंतु हा हॉट एअर बलून ४००० मीटरचा टप्पा ओलांडून आणखी उंच गेला.

पांढऱ्या रंगाचा सूट आणि हेल्मेट परिधान केलेल्या ओव्हरर्डला त्याच्या वडिलांनी चालवलेल्या फुग्यावर हा पराक्रम गाजवला, फ्रान्स २४ ने हा रिपोर्ट दिला. जेव्हा त्यांनी ३५०० मीटरचा टप्पा ओलांडला, तेव्हा वडिलांनी त्याला शांत राहण्यास सांगितलं, कारण ऑक्सिजन झपाट्याने कमी होत होता. परंतु ओव्हरार्डने सांगितले की, त्याच्या खाली असलेल्या उबदार फुग्यामुळे त्याला कोणत्याही त्रासाचा सामना करावा लागला नाही.

हेही वाचा: जगाच्या शेवटच्या टोकाला जाणारा रस्ता; पुढे जाण्यास नाही मार्ग

ओव्हरार्डने फेसबुकवर त्याच्या साहसाचे लाईव्ह-स्ट्रीमींग केले. यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सहा महिने घालवल्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला ९ नोव्हेंबर रोजी पृथ्वीवर परतलेल्या फ्रेंच अंतराळवीर थॉमस पेस्केट यांचा सन्मानानं उल्लेख केला. स्थानिक वृत्त आउटलेट्सनुसार ओव्हरार्डचा हा प्रवास जवळजवळ ९० मिनिटे चालला.

रेमी ओव्हरार्ड पश्चिम फ्रान्सच्या चॅटेलरॉल्टच्या टेलिथॉन निधी उभारणी कार्यक्रमासाठी ४०१६ मीटर (१३१७५ फूट) उंचीवर हॉट-एअर बलूनच्या शीर्षस्थानी उभा राहिला आणि त्यानं स्वतःचा विक्रम मोडीत काढला.त्याच्या या साहसाने जगभरातील लोकांची मने जिंकली.

loading image
go to top