पाकिस्तानात इंधनाचे दर भडकले; आठवडाभरात ६० रुपयांची वाढ

काल रात्री दरवाढीची घोषणा करताना पाकिस्तान सरकारने याशिवाय अन्य कोणताही पर्याय नसल्याचे देशातील नागरिकांना सांगितले.
Fuel petrol diesel and kerosene prices hike in Pakistan Within a week fuel prices rose Rs 60
Fuel petrol diesel and kerosene prices hike in Pakistan Within a week fuel prices rose Rs 60sakal

इस्लामाबाद : पाकिस्तानात पेट्रोल, डिझेल आणि केरोसिनच्या दरात गुरुवारपासून तीस रुपयांनी (पाकिस्तानी चलन) वाढ करण्यात आली आहे. काल रात्री दरवाढीची घोषणा करताना पाकिस्तान सरकारने याशिवाय अन्य कोणताही पर्याय नसल्याचे देशातील नागरिकांना सांगितले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटी आणि देशहित लक्षात घेता दरात वाढ केल्याचे म्हटले आहे. सहा दिवसांपूर्वीच पाकिस्तानात इंधनाचे दर तीस रुपयांनी वाढले होते. यानुसार आठवडाभरातच इंधनाचे दर ६० रुपयांनी वाढले आहेत.

पाकिस्तान सरकारवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा प्रचंड दबाव आहे. पाकिस्तानला अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर कडक पावले उचलावी लगातील, असे आयएमएफने म्हटले होते. केवळ इंधन दरवाढ करून लाभ मिळणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले होते. पाकिस्तानी चलनानुसार पेट्रोलचा दर लिटरमागे २०९.८६ रुपये असून डिझेल २०४.१५ रुपये, केरोसिन १८१.९४ रुपये आहे. भारताचा एक रुपया म्हणजे पाकिस्तानचे २.५५ रुपये आहेत. एका डॉलरसाठी सध्या १९८ पाकिस्तानी रुपये मोजावे लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com