esakal | ट्रम्प यांना पुन्हा झटका; जॉर्जियातील फेर मतमोजणीत बायडेनच ठरले भारी
sakal

बोलून बातमी शोधा

Biden-Trump

या निवडणुकीत जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर विक्रमी मतांनी विजय प्राप्त केला असला तरीही डोनाल्ड ट्रम्प यांनी हा विजय मान्य केला नाहीये.

ट्रम्प यांना पुन्हा झटका; जॉर्जियातील फेर मतमोजणीत बायडेनच ठरले भारी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली आहे. या निवडणुकीत जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर विक्रमी मतांनी विजय प्राप्त केला. मात्र, असं असलं तरीही डोनाल्ड ट्रम्प यांनी हा विजय मान्य केला नाहीये. आपला पराभव होतोय, याची कल्पना आल्याबरोबर त्यांनी कांगावा सुरु करत निवडणूक प्रक्रियेत घोटाळा होतोय, असा आरोप लगावला. तसेच सुप्रिम कोर्टात धाव घेऊन अनेक राज्यातील निकालांवर शंका घेतली. 

हेही वाचा - मोदी होणार G-20 समिटमध्ये सहभागी; सौदीचे राजा सलमान यांनी दिलंय निमंत्रण
मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटताना दिसतोय. जॉर्जिया प्रांतात त्यांच्या मागणीनुसार दुसऱ्यांदा केलेल्या मतमोजणीत डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडेन हेच विजयी ठरले आहेत. गुरुवारी अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितलं की, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा मॅन्यूअली पद्धतीने केलेल्या मतमोजणीत जो बायडेन यांचाच विजय झाला आहे. जॉर्जियाचे स्टेट सेक्रेटरी ब्रॅड राफेंसपरगरच्या वेबसाईटवर एका वक्तव्यात म्हटलंय की, ऑडीटने सांगितलंय की मशीनने झालेल्या पहिल्या मतमोजणीनंतर आरोप लगावण्यात आले होते. 

विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. यानंतर पुन्हा एकदा मतमोजणी करण्याचे आदेश दिले गेले होते. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यातील मतमोजणीनंतर जो बायडेन यांनी एक नवा रेकॉर्ड केला आहे. बायडेन हे तीन दशकांनंतर पहिले असे डेमोक्रॅट बनले आहेत ज्यांनी इथे विजय प्राप्त केला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पुन्हा एकदा असा दावा केला होता की, त्यांनी तीन नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत विजय प्राप्त केला आहे.

हेही वाचा - नियंत्रण रेषेवर गोळीबार नाही; पिनपॉइंट स्ट्राइकबाबत लष्कराचा खुलासा

ट्रम्प यांनी यासोबतच संपूर्ण अमेरिकेतील निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. ट्रम्प यांनी ट्विट केलंय की, मी निवडणुकीत विजय प्राप्त केला आहे. संपूर्ण देशातील निवडणुकीत विश्वासघात झाला आहे. यासोबतच त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सचे एक ट्विटदेखील जोडले आहे. ज्यामध्ये अमेरिकेच्या नकाशासोबत म्हटलंय की, त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा 1.01 कोटी अधिक मते मिळाली आहेत. 

loading image