
जर्मनीच्या चँसलर अँजेला मर्केल यांनी अमेरिकत झालेल्या हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली आहे
बर्लीन- जर्मनीच्या चँसलर अँजेला मर्केल यांनी अमेरिकत झालेल्या हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेत झालेल्या घटनेमुळे संताप आणि दु:ख झाल्याचं त्या म्हणाल्या आहेत. तसेच हिंसाचारासाठी त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरलं आहे. ट्रम्प आपला पराभव स्वीकारत नाहीत याचा खेद वाटतो, त्यांनी नोव्हेंबरमध्येही आपला पराभव अमान्य केला होता, आता बुधवारीही त्यांनी तेच केलं, असं त्या म्हणाल्या आहेत.
महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत दिल्लीत खलबतं; जेपी नड्डांसोबत केली 2 तास चर्चा
निवडणुकीच्या निकालाबाबत संभ्रम निर्माण केल्यामुळेच बुधवारची परिस्थिती निर्माण झाली आणि हिंसा घडून आली. माझ्यासह जगभरातील लोकांसाठी हा धक्का आहे, जे अमेरिकेच्या लोकशाहीच्या परंपरेचा मान ठेवतात, असं अँजेला म्हणाल्या आहेत. त्यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्या निवडीबाबात आनंद व्यक्त केला. बायडेन यांचे सरकार दंगलखोरांपेक्षा अधिक मजबूत असेल, असं त्या म्हणाल्या.
डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांची राष्ट्रपती आणि कमला हॅरिस यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. त्यांचा येत्या दोन आठवड्यात शपथविधी होईल. त्यानंतर लोकशाहीच्या नव्या पर्वाला सुरुवात होईल, असं अँजेला मर्केल म्हणाल्या आहेत.
देशातला आतापर्यंतचा सर्वांत मोठा छापा; पुण्यात कोट्यवधींचा गुटखा जप्त
दरम्यान, अध्यक्षीय निवडणुकीत पराभव झाला असूनही तो स्वीकारण्यास नकार देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी उद्दामपणाचे प्रदर्शन घडवत अमेरिकेच्या कॅपिटल इमारतीबरोबरच देशाच्या लोकशाहीवरही हल्ला केला. यावेळी पोलिसांबरोबर झालेल्या संघर्षात चार जणांचा मृत्यू झाला. या संघर्षामुळे अध्यक्षीय निवडीवर शिक्कामोर्तब करण्याच्या घटनात्मक प्रक्रियेतही अडथळे आले.
ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली होती. ते गोंधळ घालतील, अशी शंका असल्याने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, पोलिसांपेक्षा अधिक संख्येने असलेल्या समर्थकांनी थेट कॅपिटलची सुरक्षा यंत्रणा भेदून आत घुसखोरी करत तोडफोड केली. या धक्कादायक प्रकारामुळे मतमोजणी प्रक्रियेत अडथळा येऊन संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष माइक पेन्स आणि इतर सदस्यांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले. या समर्थकांचा पोलिसांबरोबरही संघर्ष झाला. या संघर्षात एका महिलेसह चौघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अनेक जणांना अटकही केली.