पाच वर्षांत 1 कोटी रोजगार; भाजपचे संकल्पपत्र जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

भाजपचा जाहीरनामा अर्थात संकल्पपत्राचे आज मुंबईत प्रकाशन झाले. यावेळी दुष्काळमुक्त महाराष्ट्र, शेतकऱ्याला चालना आणि पाच वर्षांत 1 कोटी रोजगार हे भाजपचे मुख्य उद्दिष्ट्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले.

मुंबई : भाजपचा जाहीरनामा अर्थात संकल्पपत्राचे आज मुंबईत प्रकाशन झाले. यावेळी दुष्काळमुक्त महाराष्ट्र, शेतकऱ्याला चालना आणि पाच वर्षांत 1 कोटी रोजगार हे भाजपचे मुख्य उद्दिष्ट्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले. तर मागील 5 वर्षांत अनेक मुद्दे भाजप सरकारने मार्गी लावले असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

Vidhan Sabha 2019 : पुण्यात मोदींच्या सभेसाठी 'सप' मधील झाडे सपासप कापली

भाजपच्या वचननामा प्रकाशित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, की दुष्काळमुक्त महाराष्ट्र हे आमचे ध्येय आहे. तसेच रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा व सर्व स्तरांतील लोकांपर्यंत विकास पोहोचविणे ही महत्त्वाची उद्दीष्टे आमच्या सरकारसमोर असतील. महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प सुरू करण्याचा आमचा मानस आहे. यामुळे दुष्काळी भागात पाणी पोहोचण्यास मदत होईल. कोकणात सर्वाधित पाऊस होतो व पाणी वाहून जाण्याचे प्रमाण खूप आहे. तर हे वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणून मराठवाड्याला पाणी मिळेल अशी उपाययोजना करण्याचे ध्येय आहे. मराठवाड्यात वॉटरग्रीड प्रकल्प सुरू करणार आहे. ट्रिलीयन इकोनॉमी हे फक्त स्वप्न नसून त्यामार्फत शेती, उद्योग व सेवा क्षेत्राला चालना मिळेल अशी उपाययोजना करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करत, महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत अनेक मुद्दे मार्गी लावल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील जनतेने गेली 5 वर्षे जशी साथ दिली, तशीच पुढील काळातही जनता साथल देईल. महाराष्ट्रात मागील 5 वर्षांत जातीय दंगे झाले नाहीत, कोणतेही आंदोलन संघर्षमुक्त पद्धतीने मुख्खमंत्र्यांनी सोडवले. तसेच पुढील काळात दुष्काळमुक्त राज्य व छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक साकारणे हे आमचे ध्येय राहील. मागील वर्षांत प्रत्येक क्षेत्राला न्याय देण्यासाठी आम्ही जे काम केलं ते सांगायची गरज नाही, रयतेच्या मनातलं सरकारला कळायला हवं त्याप्रमाणे आम्ही सर्व गोष्टी करत आलो. असे चंद्रकांत पाटलांनी सांगितले. यावेळी त्यांनी विरोधकांकडे नेताही नाही, बुद्धीही नाही असा टोला लगावला. 

Vidhan Sabha 2019 : सत्ता आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - उद्धव ठाकरे

पाच वर्षांपूर्वी भष्ट्राचारयुक्त सरकार होते : जे. पी. नड्डा
पाच वर्षांपूर्वी भष्ट्राचारयुक्त राज्य होते. पण भाजप सरकारच्या काळात राज्याचा विकास झाला. आता भ्रष्टाचारमुक्त राज्य झाले आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे आमचे ध्येय आहे. तसेच 2022 पर्यंत सर्वांना शुद्ध पाणी देण्याचा आमचा मानस आहे. 5 वर्षांत एक कोटी लोकांना रोजगार देण्याचेही आमचे ध्येय आहे, असे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितले. 

भाजपच्या संकल्पपत्राच्या प्रकाशनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, सरोजिनी पांडे उपस्थित होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे रामराव वडकुते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा कार्यक्रम मुंबईतील रंगशारदामध्ये पार पडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manifesto of BJP for Vidhansabha elections released