गुड न्यूज : सलग तिसऱ्या दिवशी चीनने मारली बाजी; वाचा सविस्तर बातमी

China
China

Coronavirus : बीजिंग : कोरोना संसर्गाचा केंद्रबिंदू ठरलेल्या चीनमध्ये सलग तिसऱ्या दिवशी एकही नवीन बाधित रुग्ण आढळून आला नसला, तरी गेल्या चोवीस तासांत सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या ३,२५५ वर पोचली आहे. जॉन्स हॉपिकिन्स विद्यापीठाच्या मते, जगातील १६० हून अधिक देशांत कोरोनाचा फैलाव झाला असून, जगभरात एकूण ११,३९७ जण मृत्युमुखी पडले आहेत. यासोबत २७५,२४७ जणांना बाधा झाली आहे. 

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले, की चीनच्या हुबेई प्रांतात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित एकही नवीन रुग्ण सापडला नाही. शुक्रवारी सात जणांचा मृत्यू झाला होता, तर ३६ जण संशयित म्हणून आढळून आले होते. मृतांतील सातही जण वुहानचे रहिवासी होत. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी बाधितांची संख्या ८१,००८ वर पोचली. त्यात ३,२५५ मृतांचा समावेश आहे. ६,०१३ रुग्णांवर उपचार सुरू असून ७१,७४० जणांना घरी सोडण्यात आले आहे. याशिवाय १०६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी आढळून आलेले ३६ जण हे परदेशातून आले होते. त्यामुळे परदेशातून आलेल्या बाधितांची संख्या त्या दिवशी २६९ होती. परदेशातून चीनमध्ये येणाऱ्या बाधितांची संख्या वाढत आहे. मात्र यात परकी नागरिक किती आणि चिनी नागरिकांची संख्या किती, याबाबत आरोग्य आयोगाने स्पष्ट केले नाही. चीन सरकारने परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी विलग राहण्याचे निर्बंध घातले आहेत.

शुक्रवारी परदेशातून आलेल्या ३६ जणांपैकी चौदा जण बीजिंगला, नऊ जण शांघायला, सात जण ग्वाँडूंग प्रात आणि चार जण फुजियान प्रांतात आढळून आले. झेजियांग, शाडूंग आणि शानक्सी येते प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत. हाँगकाँगमध्ये शुक्रवारपर्यंत २५६ रुग्ण आढळून आले आणि त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. 

चीनच्या फुटबॉलपटूस कोरोनाची बाधा 

चीनचा स्टार फुटबॉलपटू वुई ली यास कोरोनाची लागण झाल्याचे चीनच्या फुटबॉल संघटनेने जाहीर केले आहे. तो स्पेनच्या इस्पान्यॉलकडून खेळत होता. वुई लीमध्ये कोरोनाचे सौम्य लक्षणे आढळून आली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. चीनची फुटबॉल संघटना स्पेनच्या क्लबशी संपर्क साधून असून, आवश्‍यक ती मदत करण्याची तयारीही दर्शविली आहे. वुई ली लवकरात लवकर बरा होईल, अशी अपेक्षा चीनच्या संघटनेने व्यक्त केली आहे. २८ वर्षीय फुटबॉलपटू वुई हा चीनचा सर्वोत्तम खेळाडू असून, तो सध्या बार्सिलोना येथे घरात एकांतवासात राहत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com