esakal | सुंदर पिचाईंना जेफ बेझोस यांचा वाटतो हेवा; जाणून घ्या कारण
sakal

बोलून बातमी शोधा

jeff bezos sundar pichai

अॅमेझॉन आणि ब्लू ओरिजिनचे संस्थापक जेफ बेझोस (Amazon and Blue Origin founder Jeff Bezos) यांचा मला हेवा वाटतो, असं वक्तव्य गूगल आणि अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूंदर पिचाई (Google and Alphabet CEO Sundar Pichai) यांनी केलं आहे.

सुंदर पिचाईंना जेफ बेझोस यांचा वाटतो हेवा; जाणून घ्या कारण

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- अॅमेझॉन आणि ब्लू ओरिजिनचे संस्थापक जेफ बेझोस (Amazon and Blue Origin founder Jeff Bezos) यांचा मला हेवा वाटतो, असं वक्तव्य गूगल आणि अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूंदर पिचाई (Google and Alphabet CEO Sundar Pichai) यांनी केलं आहे. जेफ बेझोस 20 जून रोजी अवकाश सफर करणार आहेत. बेझोस यांच्या या सफरीविषयी बोलताना सुंदर पिचाई यांनी हे वक्तव्य केलं आहे. ते बीबीसीशी बोलत होते. (Google Alphabet CEO Sundar Pichai said he is jealous of Amazon Blue Origin founder Jeff Bezos )

जेफ बेझोस यांच्या अवकाश भ्रमणाबाबत तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्न सुंदर पिचाई यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, 'मला थोडासा त्यांचा हेवा वाटतो'. अवशातातून पृथ्वी कशी दिसते हे पाहायला मला आवडेल, असं भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक पिचाई म्हणाले. जेफ बेझोस यांच्या अवकाश सफरीकडे सर्व जगाचे लक्ष लागलं आहे. दोन दिवसांपूर्वी प्रतिस्पर्धी रिचर्ड ब्रॅस्नन यांनी पहिले खासगी अवकाश भ्रमण केलं. त्यांच्यासोबत भारतीय वंशाच्या सिरिषा यांनीही अवकाशात झेप घेतली होती.

हेही वाचा: पृथ्वीवर आदळणार सोलार वादळ; मोबाईल सिग्नल, GPS होणार प्रभावित

बेझोस आणि त्यांचे बंधू मार्क 20 जुलैला न्यू शेफर्ड या रॉकेटमधून अवकाशात प्रवेश करतील. ब्लू ओरिजिनच्या तळापासून हे रॉकेट उड्डाण करेल. जवळपास पंधरा मिनिटे विमान अवकाशात राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. अवकाशातून पृथ्वीचे दर्शन घेण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरु आहे. व्हर्डिन गॅलेक्टिक, ब्लू ओरिजिन आणि इलॉन मस्क यांची कंपनी अवकाश पर्यटन व्यावसायिक करण्याच्या प्रयत्नात आहेत.

हेही वाचा: लस 'मिक्स' करणे धोकादायक ट्रेंड; WHO चा इशारा

अब्जाधीश उद्योगपती रिचर्ड ब्रॅस्नन (वय ७०) यांनी आपल्या पाच सहकाऱ्यांसह ‘व्हीव्हीएस युनिटी’ या विमानातून अवकाशात उड्डाण करत रविवारी अवकाश पर्यटन क्षेत्राची दारे किलकिली केली. यामध्ये रिचर्ड ब्रॅस्नन यांनी जेफ बेझोस यांना मागे टाकले आहेत. अवकाशात झेप घेण्यासाठी या दोन्ही अब्जाधीशांमध्ये एकप्रकारे स्पर्धा होती. पण, यात ब्रॅस्नन यांनी बाजी मारली. जेफ बेझोस यांची अवकाश मोहीम ब्रॅस्नन यांच्या मोहीमेपेक्षा एक आठवड्याने उशिरा होत आहे.

loading image