सर्च इंजिन काढून घेऊ; ‘गुगल’ने दिला ऑस्ट्रेलियाला इशारा

पीटीआय
Saturday, 23 January 2021

वृत्तसंस्थांवरील माहितीसाठी पैसे भरण्यास ऑस्ट्रेलिया सरकारने भाग पाडल्यास या देशाला आपले सर्च इंजिन उपलब्ध करून देणार नाही, असा धमकीवजा इशारा ‘गुगल’ने ऑस्ट्रेलियाला दिला आहे. ऑस्ट्रेलियानेही तातडीने प्रत्युत्तर देताना ‘आम्ही धमक्यांना भीक घालत नाही,’ असे सुनावले आहे.

वेलिंग्टन - वृत्तसंस्थांवरील माहितीसाठी पैसे भरण्यास ऑस्ट्रेलिया सरकारने भाग पाडल्यास या देशाला आपले सर्च इंजिन उपलब्ध करून देणार नाही, असा धमकीवजा इशारा ‘गुगल’ने ऑस्ट्रेलियाला दिला आहे. ऑस्ट्रेलियानेही तातडीने प्रत्युत्तर देताना ‘आम्ही धमक्यांना भीक घालत नाही,’ असे सुनावले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुगल अथवा इतर कोणत्याही सोशल मीडिया कंपनीने ऑस्ट्रेलियातील वृत्त वाहिन्यांवरील मजकूर वापरल्यास त्यासाठी त्यांना पैसे द्यावे लागतील, असा निर्णय ऑस्ट्रेलिया सरकारने घेतला असून तसे विधेयकही मांडले आहे. यासाठी सरकारने नियमावलीही तयार केली असून गुगलने लिंक किंवा स्निपेट्‌सचा वापर केला तरी त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. या नियमांना गुगलचा विरोध आहे. याबाबत आज संसदीय समितीच्या चौकशीवेळी बोलताना ‘गुगल’च्या विभागीय संचालिका मेल सिल्वा यांनी कंपनीची भूमिका मांडली.

बंदिस्त जागेत अधिक काळ बोलणे टाळा!

‘ऑस्ट्रेलियाचे नवे नियम पाळणे शक्य नाही. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले तर ऑस्ट्रेलियात गुगल सर्च इंजिन बंद करण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय राहणार नाही. हे आमच्यासाठी आणि येथील नागरिकांसाठीही तोट्याचे आहे. अनेक लोक आमच्या ऑनलाइन व्यासपीठाचा उपयोग करून छोटे उद्योग चालवितात. ऑस्ट्रेलियातील वृत्तसंस्थांना त्यांनी तयार केलेल्या बातम्या आणि इतर मजकूरासाठी त्यांच्या संकेतस्थळांद्वारे पैसे मिळतात. तरीही याच मजकूरासाठी आम्ही त्यांना आणखी पैसे द्यावे, असे सरकारला वाटते,’’ असे सिल्वा यांनी समितीसमोर सांगितले. फेसबुकनेही ऑस्ट्रेलियाच्या नियमांना विरोध केला आहे. 

स्वदेशी कोव्हॅक्सिनने पास केली महत्त्वाची 'परीक्षा'; घाबरण्याचं कारण नाही

ऑस्ट्रेलियाचे म्हणणे
‘गुगल’च्या इशाऱ्याला पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी तातडीने प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही आमच्या जागेत काय करणार याचा निर्णय ऑस्ट्रेलिया सरकार घेणार, आमची संसद घेणार. ऑस्ट्रेलियात कामकाज असेच चालते, असे मॉरिसन यांनी स्पष्ट केले. येथील अनेक संस्थांनीही, सरकारने आपल्या भूमिकेवर ठाम रहावे, असा आग्रह धरला आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google warns Australia to remove search engine