
जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाचा अमेरिकेतील मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर मागील काही दिवसांपासून अमेरिकेच्या विविध शहरात वर्णभेदाविरुद्ध जोरदार आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनांना आर्थिक हातभार देण्याची घोषणा गुगलने केली आहे. कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत वर्णभेदाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होऊन देशातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
वॉशिंग्टन - जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाचा अमेरिकेतील मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. त्यानंतर मागील काही दिवसांपासून अमेरिकेच्या विविध शहरात वर्णभेदाविरुद्ध जोरदार आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनांना आर्थिक हातभार देण्याची घोषणा गुगलने केली आहे. कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत वर्णभेदाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होऊन देशातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत वर्णभेदाविरुद्धच्या आंदोलनाला सर्वच क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे. आता गुगलने देखील वर्णभेदाविरुद्धच्या या लढ्याला पाठिंबा दिला असून, ३७ दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी याबाबतची माहिती दिली असून, आज पर्यंत वर्णभेदामुळे आपले प्राण गमावलेल्या सर्वांच्या स्मरणार्थ ८ मिनिटे ४६ सेकंद मौन पाळण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. गुगलकडून देण्यात येणाऱ्या या मदतीपैकी १२ दशलक्ष डॉलर्स वर्णभेदाविरुद्धच्या लढाईसाठी काम करत असलेल्या संघटनांना देण्यात येणार आहे. तर उर्वरित रक्कम ग्रान्टस च्या स्वरूपात देण्यात येणार आहे.
म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले इराणचे आभार
याअगोदर, गुगलने आपल्या युट्युब आणि गुगलच्या वॉल वर वर्णभेदाविरुद्धच्या लढ्याला पाठिंबा देण्याकरिता, आम्ही वांशिक समानतेचे समर्थन करतो आणि जे याविषयी शोध घेत आहेत अशा सर्वांच्या समर्थनार्थ आम्ही उभे आहोत, असे लिहिले होते.
पाकिस्तानकडून पुन्हा नापाक कृत्य; भारतीय राजदूतांना धमकावण्याचा प्रयत्न
दरम्यान, जॉर्ज फ्लॉयड या ४६ वर्षाच्या कृष्णवर्णीय नागरिकाचा मृत्यू २५ मे रोजी अमेरिकेतील मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत झाला होता. त्यानंतर जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूचा व्हिडीओ अमेरिकेत विविध ठिकाणी व्हायरल झाल्यानंतर आंदोलनाला सुरुवात झाली होती. हे आंदोलन काळानंतर हिंसक बनत गेले. आणि त्यामुळे अमेरिकेतील अनेक राज्य आणि शहरात संचारबंदी लागू करण्यात आली.