मलेरियाविरुद्धच्या युद्धात भारताला मोठे यश

malaria
malaria

‘डब्लूएचओ’ची कौतुकाची थाप; रुग्णांबरोबर मृत्यूचे प्रमाणही घटले 
न्यूयॉर्क - जगासह भारतातही कोरोना साथीचा प्रसार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मलेरियाविरुद्धच्या युद्धात देशाने जागतिक पातळीवर मोठे यश मिळविले आहे. भारतात २००० साली मलेरियाचे दोन कोटींहून अधिक रुग्ण होते. २०१९ मध्ये ५६ लाखांपर्यंत घट झाली आहे. ‘जागतिक मलेरिया अहवाल २०२०’ मध्ये ही बाब उघड झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या अहवालानुसार, जगभरात २०१९ मध्ये मलेरियाचे २२ कोटी ९० लाख रुग्ण होते. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षांत साधारणत: दरवर्षी एवढेच रुग्ण आढळत आहेत. भारतात मलेरियाच्या रुग्णांबरोबरच मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. ते २००० मधील २९,५०० वरून २०१९ मध्ये ७,७०० पर्यंत कमी झाले.

डब्लूएचओने जगभरातील देशांना मलेरियाविरुद्धचा लढा तीव्र करण्याचे आवाहनही केले आहे. दरवर्षी हा टाळता येणारा आजार हजारो जणांचे प्राण घेतो. त्यामुळे, मलेरियाविरुद्धचे आंतरराष्ट्रीय लक्ष्य गाठण्यासाठी नवीन साधने आणि निधी वाढविण्याची गरजही या अहवालात नमूद केली आहे. 

भारतासह जगभरातील ११ देशांमध्ये एकूण जागतिक रुग्णांपैकी ७१ टक्के रुग्ण आढळतात. आफ्रिका खंडात २००० पासून सुधारणा झाली असली तरी अलीकडील काही वर्षांत मलेरियाने तेथे पुन्हा डोके वर काढले आहे. यंदा कोरोनामुळे आरोग्य सुविधांपुढे आव्हान उभे ठाकल्याचे अहवालात अधोरेखित केले आहे.

विशेषत: दक्षिण-पूर्व आशियामध्ये मलेरियामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. रुग्ण व मृत्यूची टक्केवारी अनुक्रमे ७३ आणि ७४ टक्क्यांनी घटली आहे. त्यातही भारतातील मलेरिया रुग्ण खूपच कमी झाले आहेत.  
- डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयसूस, सरचिटणीस, डब्लूएचओ 

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com