hafiz saeed
hafiz saeed

पाकिस्तान दहशतवादी हाफिज सईदच्या घराबाहेर बाॅम्बस्फोट, चौघांना फाशीची शिक्षा

पाकिस्तानातील हाफिज सईद हा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार आहे.
Published on

लाहोर : पाकिस्तानमध्ये बुधवारी (ता.१२) एका दशहतवाद विरोधी न्यायालयाने मुंबई हल्ल्यातील (Mumbai Terrorist Attack) सूत्रधार आणि जमात-उद-दवाचा प्रमुख हाफिज सईदच्या (Hafiz Saeed) घराबाहेर बाॅम्बस्फोट करणाऱ्या चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. बाॅम्बस्फोटाची घटना गेल्या जून महिन्यात घडली होती. न्यायालयातील एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. गेल्या वर्षी जूनमध्ये सईदच्या घराबाहेर एका कारमध्ये भीषण बाॅम्बस्फोट (Pakistan) झाला होता. यात तीन लोकांचा मृत्यू, तर २० लोक जखमी झाले होते. दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश अर्शद भुट्ट यांनी कोट लखपत तुरुंगात झालेल्या सुनावणी दरम्यान आयशा बीबी नावाच्या एका महिलेला पाच वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.(Hang 4 Convict In Bomb Blast Case, Anti Terrorist Court Rule In Pakistan)

hafiz saeed
Mahindra ने 'या' बाईकला दिले नव रुप, भारतात २६ वर्षानंतर होणार लाँच

न्यायालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले, लाहोरच्या दहशतवादी विरोधी न्यायालयाने बंदी घातलेली संघटना तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानचे ईद गुल, पीटर पाॅल डेव्हिड, सज्जाद शहा आणि जियाउल्ला यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. एक अन्य आरोपी आयशा बीबीला पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com