हवामान बदलामुळे अमेरिकेतील शेकडो शहरे बुडतील...

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 जुलै 2017

या शतकाच्या शेवटापर्यंत अमेरिकेमधील 50 पेक्षाही जास्त मोठ्या शहरांना या परिस्थितीचा फटका बसेल; तर बोस्टन, फ्लोरिडा यांसारखी महत्त्वपूर्ण शहरे पाण्याखाली जातील, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे

वॉशिंग्टन - हवामान बदलामुळे सागरी पातळी वाढून येत्या 20,50 वा 80 वर्षांत अमेरिकेमधील शेकडो शहरांना फटका बसेल, असा इशारा नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यास अहवालाच्या माध्यमामधून देण्यात आला आहे.

न्यूयॉर्क, बोस्टन, सॅन फ्रान्सिस्को वा मायामी यांसारख्या अमेरिकेमधील मुख्य शहरांमध्ये सागरी पातळी वाढून अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण होईल, असे निरीक्षण 'युनियन ऑफ कन्सर्नड सायंटिस्ट्‌स' या संस्थेच्या या अभ्यास अहवालामध्ये नोंदविण्यात आले आहे.

""सागरी पातळी वाढणे याचाच अर्थ किनारपट्टी भागात वारंवार पूरस्थिती उद्‌भविणे असा असल्याचे ध्यानी घेणे गरजेचे आहे. किंबहुना किनारपट्टीत सध्याही निर्माण होणारी पूरस्थिती निसर्गामधील मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होते आहे,'' असे या अभ्यास प्रकल्पाशी संबंधित असलेल्या एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाने यासंदर्भात बोलताना स्पष्ट केले.

या शतकाच्या शेवटापर्यंत अमेरिकेमधील 50 पेक्षाही जास्त मोठ्या शहरांना या परिस्थितीचा फटका बसेल; तर बोस्टन, फ्लोरिडा यांसारखी महत्त्वपूर्ण शहरे पाण्याखाली जातील, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Higher seas to flood US cities