हिवाळ्यात कोरोनाचा धोका जास्त; रिसर्चमध्ये नेमकं काय म्हटलंय?

पीटीआय
Friday, 16 October 2020

हवेतून विषाणूंचे कण त्यात मिसळतात. विषाणूंचे हे कण १० मायक्रॉनपेक्षा लहान असल्याने बोलण्यातून श्‍वासावाटे ते सहज आत प्रवेश करतात, असे अभ्यासाचे मुख्य लेखक ली झाओ यांनी सांगितले. 

लॉस एन्जेलिस: कोरोनाव्हायरच्या संसर्गासंदर्भात सातत्याने संशोधन होत आहे. नव्या संशोधनानुसार उन्हाळ्यात कोरोनाचा प्रसार सूक्ष्मतुषारांमुळे मोठ्या प्रमाणावर झाला. हिवाळ्यातील थंडीच्या दिवसांत श्‍वास घेताना बाहेर पडणाऱ्या कणांशी थेट संपर्क आल्याने कोरोनाचा धोका वाढू शकतो, असे मत एका संशोधनात व्यक्त केले आहे. 

‘नॅनो लेटर्स’ या नियतकालिकात यासंबंधीचा पथदर्शी अभ्यासलेख प्रसिद्ध झाला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सध्या सुरक्षित अंतराचे पालन केले जाते, ते पुरेसे नाही, याकडे लेखातून लक्ष वेधले आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठ सांता बार्बरा येथील या लेखाच्या सहलेखक यानयिंग झू म्हणाले की, सहा फूट सुरक्षित अंतराची शिफारस ‘सीडीसी’ने केली असली तरी श्‍वसनावाटे उडणारे तुषार हे त्यापेक्षा जास्त अंतरापर्यंत पोचतात.

भारतातील नागरिक दीर्घायुषी; जगातील 200 देश आणि विविध भागात मृत्यूची 286 कारणे

घर किंवा कार्यालयांतील अंतर्गत वातावरणात जेथे फ्रिज, कुलर यांचे तापमान कमी असते हे तुषार जमिनीवर पडण्यापूर्वी सहा फुटापर्यंत पोचू शकतात. अशा वातावरणात विषाणू जास्त काळ टिकतो आणि काही मिनिटांपासून संपूर्ण दिवस त्यापासून संसर्गाचा धोका कायम राहतो. यानुसार मांस प्रक्रिया केंद्रातून कोरोना विषाणूंचा संसर्ग झपाट्याने पसरू शकतो, असे म्हणता येऊ शकेल. 

याउलट उष्ण आणि कोरड्या वातावरणात श्वासावाटे बाहेर पडणाऱ्या तुषारांचे सहजपणे बाष्पीकरण होते. अशा स्थितीत या कणांमधून अगदी लहान विषाणूंचे कण मागे राहतात. हवेतून विषाणूंचे कण त्यात मिसळतात. विषाणूंचे हे कण १० मायक्रॉनपेक्षा लहान असल्याने बोलण्यातून श्‍वासावाटे ते सहज आत प्रवेश करतात, असे अभ्यासाचे मुख्य लेखक ली झाओ यांनी सांगितले. 

मी तर सगळ्यांनाच भेटतो; खडसेंच्या पक्ष प्रवेशावर अजित पवारांची प्रतिक्रिया​

अभ्यासातील निरीक्षणे 
- हिवाळ्यात अशा विषाणूंच्या कणांशी संपर्क झाल्यात कोरोना होण्याचा धोका अधिक. 
- उन्हाळ्यात हवेतून संसर्गाचे प्रमाण जास्त. 
- स्थानिक वातावरणानुसार कोरोनापासून बचावाच्या उपायांमध्ये बदल करणे आवश्‍यक. 
- कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी राहावे यासाठी नियमावली तयार करण्यास या संशोधनाची मदत 
- एखाद्याच्या शरीरावर कोरोनाचे विषाणू किती काळ राहतात, हे समजू शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How is the novel coronavirus likely to behave in winter

Tags
टॉपिकस
Topic Tags: