Citizenship Rules: पाकिस्तानसह मुस्लीम देशांमध्ये कसे मिळते नागरिकत्व? काय आहेत नियम? जाणून घ्या

Citizenship in Muslim countries: देशात सध्या सीएएच्या मुद्द्यावरुन वातावरण तापू लागलं आहे. केंद्र सरकारने सीएएची अंमलबजावणी सुरु केली आहे.
Citizenship Rules
Citizenship Rules

नवी दिल्ली- देशात सध्या सीएएच्या मुद्द्यावरुन वातावरण तापू लागलं आहे. केंद्र सरकारने सीएएची अंमलबजावणी सुरु केली आहे. या कायद्यातंर्गत पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश या देशातील हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, शीख, ख्रिश्चन या लोकांना भारताचे नागरिकत्व दिले जाणार आहे. मुस्लीम देशांमध्ये नागरित्व मिळवण्यासाठी काय तरतूद आहे हे आपण पाहूया. (How to get citizenship in Muslim countries including Pakistan What are the rules)

नागरिकत्व मिळण्यासाठी सर्वसाधारण काय नियम आहेत?

१. मुलाचा जन्म जेथे झाला, त्या देशाचे त्याला नागरिकत्व मिळते

२. तुमचे आई-वडील ज्या देशाचे आहेत, त्या देशाचे तुम्हाला नागरिकत्व मिळेल

३. दुसऱ्या देशाचे तुम्ही नागरिक होऊ शकता. पण, तुम्हाला त्या देशाने निर्धारित केलेला कालखंड त्या देशात राहावं लागतं. याचा अर्थ तुम्ही काही वर्षे त्या देशाचे रहिवाशी असायला हवेत.

Citizenship Rules
Amit Shah: फाळणीवेळी पाकिस्तानमध्ये 21 टक्के हिंदू, आता...; CAA बाबत अमित शाहांनी स्पष्ट केली भूमिका

जन्माच्या आधारे कोणत्या देशात मिळते नागरिकत्व?

३० पेक्षा जास्त देश जन्माचा आधार घेतात. म्हणजे त्या देशात जन्म झाला असेल तर तुम्हाला नागरिकत्व मिळून जाते. यात अमेरिका, कॅनडा, अर्जेंटिना, बोलिविया, फिजी, इक्वाडोर, ग्वाटेमाला, क्यूबा, व्हेनेझुएला या सारख्या देशांचा समावेश होतो. काही देशात नागरिकत्व मिळण्यासाठी तुमचे आई-वडील त्या देशाचे नागरिक असणे आवश्यक असते.

मुस्लीम देशांमध्ये कशी मिळते नागरिकता?

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. धर्मपरिवर्तन हे त्यामागचे कारण असल्याचं सांगितलं जातं. पाकिस्तानमध्ये केवळ मुस्लीम असल्याने नागरिकत्व मिळत नाही. विदेशी व्यक्तीला देशात किमान ४ वर्षे काढणे आवश्यक असते. त्यानंतर व्यक्तीला अर्ज करता येतो. बांगलादेशमध्ये वेगळे नियम आहेत. आई-वडिलांपैकी एकाचा जन्म देशात झाला असल्यास त्याला नागरिकत्व मिळते. केवळ मुस्लीम असल्याने बांगलादेशमध्ये नागरिकत्व मिळत नाही.

इराण, इराक, कतारमध्ये काय स्थिती?

आई-वडिलांपैकी एकाचा जन्म कतारमध्ये झाला असल्यास त्याला नागरिकत्व मिळू शकते. याशिवाय तुम्हाला इथले नागरिकत्व मिळवायचे असेल तर तुम्हाला तब्बल २५ वर्षे या देशात राहावं लागेल. इराणमध्ये जन्माच्या आधारे नागरिकत्व मिळते. याशिवाय तुम्ही चार वर्षांपासून इराणमध्ये राहत असाल तर नागरिकत्वासाठी अर्ज करु शकता. इराकमध्ये देखील अशाच प्रकारचा नियम आहे. केवळ मुस्लीम आहे म्हणून हे देश व्यक्तीला नागरिकत्व देत नाहीत.

Citizenship Rules
Amit Shah: राज्यांनी CAA लागू केले नाही तर केंद्र सरकार काय करणार? अमित शाहांनी दिलं उत्तर

सौदी अरेबियाचे नागरिकत्व

सौदी अरेबियात बिगर सौदी वडील आणि सौदी आईकडून झालेला मुलाला नागरिकत्व मिळू शकते. मात्र, अनेक अटी आहेत. व्यक्तीकडे कायमचा पत्ता असायला हवा. त्याला अरबी भाषा बोलता यावी किंवा त्याचे आई-वडील सौदी देशाचे असायला हवेत. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com