esakal | ओहियोचा वादविवाद मी जिंकला : डोनाल्ड ट्रम्प
sakal

बोलून बातमी शोधा

डलुथ - अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीनिमित्त प्रचारासाठी बुधवारी डलुथ विमानतळावर आगमन झाले असता अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उपस्थितांना अभिवादन केले.

अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक महिन्यावर आली असून, या निमित्तिाने आयोजित पहिला वादविवाद आपण जिंकल्याचा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ओहियो येथे काल रात्री अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्यात पहिला वादविवाद झाला. यानंतर ट्रम्प यांनी आज व्हाइट हाउस येथे पत्रकारपरिषदेत कालची चर्चा आम्ही सहजपणे जिंकली, असा दावा केला आहे. प्रतिस्पर्धी खुपच हतबल दिसून आले, अशीही टीका ट्रम्प यांनी केली.

ओहियोचा वादविवाद मी जिंकला : डोनाल्ड ट्रम्प

sakal_logo
By
पीटीआय

वॉशिंग्टन - अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक महिन्यावर आली असून, या निमित्तिाने आयोजित पहिला वादविवाद आपण जिंकल्याचा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ओहियो येथे काल रात्री अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्यात पहिला वादविवाद झाला. यानंतर ट्रम्प यांनी आज व्हाइट हाउस येथे पत्रकारपरिषदेत कालची चर्चा आम्ही सहजपणे जिंकली, असा दावा केला आहे. प्रतिस्पर्धी खुपच हतबल दिसून आले, अशीही टीका ट्रम्प यांनी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तीनपैकी पहिला वादविवाद ओहियो येथे आयोजित करण्यात आला होता. या वादविवादात ट्रम्प आणि बायडेन यांनी दावे-प्रतिदावे केले. दोन्ही गटांनी विजयाचा दावा केला आहे. या वादविवादावर जगभरातील माध्यमातून चर्चा होत असताना ट्रम्प यांनी पत्रकारांना कालचा वादविवाद सहजपणे जिंकल्याचे सांगितले. माझे मते ते (बायडेन) खूपच कमकुवत होते. चर्चेच्या वेळी आरडाओरड करत होते. पण आपण प्रत्येक निवडणुकीत चर्चा जिंकली आहे. जर आपण अन्य निवडणुकीचा विचार केल्यास त्या प्रत्येक निवडणुका जिंकल्या आहेत. आगामी फ्लोरिडा आणि टेनेसी येथील वादविवादाची आपण वाट पाहत आहोत, असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांनी पराभव झाल्यानंतर राष्ट्राध्यक्षपद सोडायला नकार दिला तर काय?

आपल्याला त्यांच्यासमवेत वाद करण्यात कोणतीही अडचण नाही. परंतु ते या वादविवादापासून दूर राहू इच्छित आहेत, असे वाटते. अर्थात ही गोष्ट त्यांनाच ठाऊक आहे, असे ट्रम्प म्हणाले. कट्टर श्‍वेतवर्णीय प्राउड बॉइज बाबत विचारलेल्या प्रश्‍नावर ट्रम्प म्हणाले की, त्यांनी पाऊल मागे घ्यायला पाहिजे आणि काळाबरोबर पुढे यायला पाहिजे. मला प्राउड बॉइजबाबत फारशी माहिती नाही.  उलट प्राउड बॉइज म्हणजे काय, हे तुम्ही (पत्रकारांनी) सांगायला हवे. खऱ्या अर्थाने मला त्याचा अर्थ ठाऊक नाही. या वेळी मी एवढेच सांगू इच्छितो की, त्यांना माघार घ्यायला वही. त्यांनी सक्तवसुली संचालनालयास सहकार्य करायला हवे, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली.

COVID 19 Vaccine - अमेरिकेच्या मॉडर्नाने दिली खूशखबर; कोरोनावर लस ठरतेय प्रभावी

डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, रशिया आणि भारत यांना एकत्र करुन तिन्ही देशांवर कोरोनामुळे झालेल्या मृत्युची संख्या लपवण्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी तिन्ही देश हवेतील प्रदूषण करत असल्याचे म्हटले आहे. मोदी जी, आता आपण प्रिय मित्राच्या सन्मानार्थ ‘नमस्ते ट्रम्प’ ची आणखी एक रॅली काढणार काय?
- पी. चिदंबरम, कॉंग्रेस नेते.

Edited By - Prashant Patil