Global recession hits share market down trend Sensex nifty  US stock market Stagflation mumbai
Global recession hits share market down trend Sensex nifty US stock market Stagflation mumbaisakal

IMF चा गंभीर इशारा: आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी धोरण तयार करण्याचे आवाहन

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने 2023 मध्ये जागतिक आर्थिक वाढीचा अंदाज पुन्हा एकदा कमी केला आहे. IMF नुसार 2026 पर्यंत जागतिक अर्थव्यवस्था 4 लाख कोटी डॉलरने कमी होऊ शकते. IMF ने मंदीच्या धोक्याबद्दल चेतावणी देत आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी धोरण तयार करण्याचे आवाहन केले आहे. (IMF news in Marathi)

Global recession hits share market down trend Sensex nifty  US stock market Stagflation mumbai
'भारत जोडो' यात्रेत राहुल गांधींच्या पोस्टरवर सावरकर; काँग्रेसने घेतला मोठा निर्णय

आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी गुरुवारी जॉर्जटाउन विद्यापीठात एका कार्यक्रमाला संबोधित करताना जागतिक आर्थिक वाढ मंदावण्याची भीती व्यक्त केली. त्या म्हणाल्या की आर्थिक आघाडीवर काही बाबी चांगल्या होण्याआधीच बिघडण्याची शक्यता जास्त दिसते. असे नाही की गोष्टी चांगल्या होणार नाहीत, परंतु सुरुवातीला काही बाबी अधिक गंभीर होऊ शकता.

जॉर्जिव्हा म्हणाल्या की IMF ने आधीच तीन वेळा जागतिक आर्थिक वाढीचा अंदाज कमी केला आहे. 2022 मध्ये हे प्रमाण 3.2 टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज होता, मात्र आता ते केवळ 2.9 टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com