Wife Birthday And Punishment : पत्नीचा वाढदिवस विसरल्यास पतीला होते शिक्षा!; या देशात आहे विचित्र कायदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पत्नीचा वाढदिवस विसरल्यास पतीला होते शिक्षा!

जसे आई आणि मुलांचे, बहीण आणि भावाचे नाते महत्त्वाचे असते तसेच पती-पत्नीचे नातेही तितकेच महत्त्वाचे असते. पती-पत्नी हे सुख-दुःखाचे साथीदार असतात. त्यांच्यात भांडणे होत असतात. मात्र, प्रेमही तितकेच असते. यामुळेच पत्नीला अर्धांगिनी म्हटले जाते. कितीही प्रेम असले तरी पतीने पत्नीचा वाढदिवस विसरणे किंवा पत्नीने पतीचा वाढदिवस विसरणे काही नवीन नाही. मात्र, एक देश असा आहे, जिथे पत्नीचा वाढदिवस विसरलं तर पतीला कठोर शिक्षा दिली जाते.

या जगात अनेक देश आहेत. मात्र, प्रत्येक देशाचा कायदा वेगळा आहे. काही कायदे सारखे असले तरी भिन्नता पाहायला मिळते. काही कायदे कठोर वाटत असतात तर काही कायदे आरामदायीही असतात. तसेच काही कायदे अगदी विचित्र असतात. यामुळे संबंधित देशातील नागरिकाला नाहक त्रास सहन करावा लागतो. कुठे कुठे असे कायदे अतिशय काटेकोरपणे पाळले जातात.

हेही वाचा: सेक्समुळे स्पेनचा समुद्रकिनारा झाला उद्ध्वस्त; आढळले २९८ स्पॉट

काही कायदे असे असतात ज्याबद्दल ऐकताच हसू आवरत नाही. म्हणजे असेही कायदे असू शकतात हे ऐकून हसावं की रळाव हेसुद्धा समजत नाही. असाच एक कायदा प्रशांत महासागरातील पॉलिनेशियन भागातील सामोआ देशामध्ये आहे. हे एक बेट आहे. सौंदर्यासोबतच हा देश जगामध्ये अनोख्या कायद्यांसाठीही ओळखला जातो.

असा आहे कायदा

सामोआ देश त्याच्या सौंदर्यामुळे तसेच विचित्र कायद्यामुळे जगामध्ये प्रसिद्ध आहे. या देशात पती पत्नीचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा अन्य कोणतीही महत्त्वाची तारीख विसरला तर शिक्षा होऊ शकते. तसेच पत्नी पतीवर नाराज झाली किंवा बोलणे बंद केले तरी पतीला शिक्षा होऊ शकते.

हेही वाचा: दारूसोबत चकणा म्हणून या पदार्थांचे तर सेवन करत नाही ना?

पोलिसांकडून मिळते ताकीद

सामोआ देशात बायकोचा वाढदिवस चुकून विसरनेही एकप्रकारचा गुन्हा आहे. पत्नीने याची तक्रार पोलिस ठाण्यात केली तर पतीला तुरुंगातही जावे लागू शकते. पतीचा दोष असला तरी आपली चूक सुधारण्याची एक संधी दिली जाते. पहिल्यांदा बायकोचा वाढदिवस विसरल्यास पतीला पोलिसांकडून ताकीद दिली जाते. पुढच्या वेळेस अशी चूक केल्यास शिक्षा केली जाईल, असेही पोलिसांकडून सांगितले जाते.

loading image
go to top