

Imran Khan death claim and latest Pakistan jail news
esakal
Imran Khan Death Claim Sparks Controversy : पाकिस्तानचे तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा मृत्यू झाला असल्याचा दावा पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार वजाहत एस. खान यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे पाकिस्तानसह जगभरात खळबळ उडाली आहे.
पाकिस्तान सरकार आणि लष्करातील सूत्रांच्या आधारे त्यांनी हा दावा केला असून, खान यांचा कोठडीतच मृत्यू झाल्याचे आणि त्यामुळेच त्यांना कोणालाही भेटू दिले जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान इम्रान खान यांच्या सध्याच्या स्थितीबाबत पाकिस्तानी सरकारकडून कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.