Pakistan : पाकिस्तानामध्ये विवाहित हिंदू महिलेचे अपहरण, इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यावर केला बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Pakistan : पाकिस्तानामध्ये विवाहित हिंदू महिलेचे अपहरण, इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यावर केला बलात्कार

Pakistan : पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अपहरण झालेल्या एका विवाहित हिंदू महिलेने म्हटले आहे की, अपहरणकर्त्यांनी तिला इस्लाम स्वीकारण्याची धमकी दिली आणि तिने धर्मांतर करण्यास नकार दिल्यावर तिच्यावर बलात्कार केला.

अल्पसंख्याक समाजातील नागरिकांवर अत्याचाराची अशी प्रकरणे देशात सातत्याने समोर येत आहेत. सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये मुलीने सांगितले की, उमरकोट जिल्ह्यातील सामरो शहरात तिच्यावर बलात्कार झाला आणि पोलिसांनी अद्याप संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला नाही.

काय म्हणाले स्थानिक नेते?

हिंदू समुदायाच्या एका स्थानिक नेत्याने सांगितले की, ''रविवारपर्यंत मीरपूरखासमधील पोलीस, महिलेने नाव दिलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला नाही. महिला आणि तिचे कुटुंबीय पोलिस स्टेशनच्या बाहेर बसले आहेत, परंतु अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही,"

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

महिलेचे आधीच लग्न झालेले आहे. इब्राहिम मंगरियो, पुन्हो मंगरियो आणि त्यांच्या साथीदारांनी अपहरण केल्याचा दावा व्हिडिओमध्ये केला आहे. मुलीने सांगितले की, त्यांनी तिला धमकावले आणि धर्मांतर करण्यास सांगितले, परंतु तिने नकार दिल्याने तीन दिवस तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

पीडितेने सांगितले की, अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर ती घरी परतली. सिंधच्या अंतर्गत भागात हिंदू मुलींचे अपहरण आणि जबरदस्तीने धर्मांतर करणे ही मोठी समस्या बनली आहे.

थार, उमरकोट, मीरपूरखास, घोटकी आणि खैरपूर भागात प्रामुख्याने हिंदू समाजाचे लोक राहतात. हिंदू समाजातील बहुतांश सदस्य या भागात मजूर आहेत.

गेल्या वर्षी जूनमध्ये हिंदू मुलगी करीना कुमारी हिने येथील न्यायालयात सांगितले की, तिला बळजबरीने इस्लाममध्ये धर्मांतरित करून मुस्लिम पुरुषाशी लग्न केले.

गेल्या वर्षी मार्चमध्ये, तीन हिंदू मुली - सतरन ओड, कविता भील आणि अनिता भील - यांचे अपहरण करण्यात आले होते, त्यांना जबरदस्तीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले गेले आणि आठ दिवसात मुस्लिम पुरुषांशी लग्न लावून दिले.

हेही वाचा: Petrol Price News : सर्वसामान्यांना धक्का! 'पेट्रोल स्वस्त होईल अशी अपेक्षा करू नका'

गेल्या वर्षी 21 मार्च रोजी, सुक्कुरच्या रोहरी येथे पूजा कुमारीची तिच्या घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. केवळ मुलीच नाही तर वृद्ध हिंदू महिलाही अपहरण आणि जबरदस्तीने धर्मांतराला बळी पडल्या आहेत.

चार मुलांची आई असलेल्या घोरी कोहलीचे सिंधमधील खिप्रो येथून अपहरण करण्यात आले आणि नंतर तिने इस्लाम स्वीकारल्याचे कळले. या महिलेचे लग्न अपहरणातील आरोपी एजाज मेरीशी झाले होते.

टॅग्स :Pakistanrape news