'भारताने आमच्या एअरबेसवर आधी हल्ला केला'; पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांची थेट कबुली, 'ऑपरेशन सिंदूर'वर मोठा खुलासा

Pakistani Deputy PM Ishaq Dar : २२ एप्रिल रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा बळी गेला होता. त्यानंतर भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवून सीमापार ठिकाणांना अचूक लक्ष्य केलं.
Pakistani Deputy PM Ishaq Dar
Pakistani Deputy PM Ishaq Daresakal
Updated on

इस्लामाबाद/नवी दिल्ली : पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार (Pakistani Deputy PM Ishaq Dar) यांनी पहिल्यांदाच स्पष्टपणे कबूल केलंय, की 'भारतानं ऑपरेशन सिंदूरदरम्यान (Operation Sindoor) पाकिस्तानच्या दोन महत्त्वाच्या लष्करी एअरबेसवर हवाई हल्ले केले. हे हल्ले ७ मे रोजी रावळपिंडी येथील नूर खान एअरबेस आणि शोरकोट एअरबेसवर झाले, ज्याचे उद्दिष्ट सीमापार दहशतवादी तळांवर कारवाई करणे होते.'

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com