
भारत आणि चीनमधील नुकत्याच झालेल्या करारामुळे नेपाळमध्ये राजनैतिक गोंधळ निर्माण झाला आहे. भारत आणि चीनने भारताच्या ज्या भूभागावर नेपाळ आपला दावा करतो त्या भूभागावर एक करार केला आहे. याचा अर्थ असा की चीनने हे भूभाग भारताचे असल्याचे मान्य केले आहे. नेपाळला आशा होती की भारताच्या भूभागावरील त्यांच्या दाव्याला चीनचा पाठिंबा मिळेल. दुसरीकडे, भारताने पुन्हा एकदा नेपाळचा हा दावा फेटाळून लावला आहे.