चीनचे सुरक्षाविषयक आव्हान मोठे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India and China

चीनचे सुरक्षाविषयक आव्हान मोठे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आपल्या देशासमोर चीनने मोठे सुरक्षाविषयक आव्हान निर्माण केले असून भारताने देखील खबरदारीचा उपाय म्हणून शेकडो तुकड्या आणि अन्य शस्त्रे मागील वर्षीच सीमावर्ती भागामध्ये हालविली आहेत. आपल्याला आणखी बराच काळ त्याठिकाणी राहावे लागेल. चीनने पुन्हा गलवानसारखी आगळीक केली तर त्यांना पूर्वीच्याच भाषेत उत्तर देण्यात येईल असे मत सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांनी मांडले आहे. एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये विश्वासाचा अभाव असून संशयाचे वातावरण देखील आणखी गडद झाले आहे. यामुळे सीमावादाचे देखील निराकरण होताना दिसत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: "कंगनाचं ते वक्तव्य चुकीचं पण..."; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

मागील महिन्यामध्येच भारत आणि चीन यांच्यातील कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांची बोलणी पार पडली होती पण त्यातून देखील तोडगा निघू शकला नाही. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी माघार घेण्यास ठामपणे विरोध दर्शविला आहे. चीनने सीमावर्ती भागातील स्वतःची ताकद आणखी वाढवायला सुरूवात केली असून भारताने देखील खबरदारीचा उपाय म्हणून या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी तुकड्या तैनात केल्या असल्याचे रावत यांनी सांगितले. अफगाणिस्तानातील ताज्या राजकीय स्थित्यंतरावर देखील रावत यांनी चिंता व्यक्त केली.

या सगळ्या बदलांचा भारताच्या सुरक्षेवर देखील परिणाम होईल असे त्यांनी सांगितले. जम्मू- काश्मीरमधील दहशतवाद्यांना अफगाणिस्तानातून पाठबळ मिळू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. चीन आणि पाकिस्तानने निर्माण केलेल्या सुरक्षाविषयक आव्हानांमुळेच थिएटर कमांडची निर्मिती झाल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

डेटा विधेयकाला तातडीने मान्यता हवी

संसदेमध्ये २०१९ साली सादर करण्यात आलेल्या डेटा संरक्षण विधेयकालात तातडीने मान्यता मिळणे गरजेचे आहे. सध्याच्या व्हर्च्युअल जगामध्ये डेटा चोरी हा सर्वसामान्य गुन्हा बनला असल्याचे मत रावत यांनी मांडले. केरळ पोलिसांच्या वतीने आयोजित सायबर संमेलनामध्ये बोलताना त्यांनी ही बाब मांडली. भारतामध्ये वेगळा सायबर सुरक्षा कायदा नाही त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर व्हर्च्युअल सुरक्षा ही खूप महत्त्वाची गोष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.

व्हर्च्युअल स्पेसच्या सुरक्षेसाठी आपल्याला एक वेगळा आराखडा तयार करावा लागेल. अनेक सरकारी संस्था सायबर सुरक्षेचा मुद्दा हाताळताना दिसतात. आता विविध पातळ्यांवर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी अधिक संघटितपणे आणि एका दिशेने काम करणे गरजेचे असल्याचे मत रावत यांनी मांडले.

loading image
go to top