'आत्मनिर्भर' भारताच्या भूमिकेमुळे चीन हैराण!

सुशांत जाधव
Saturday, 8 August 2020

युरोपीयन फाउंडेशन फॉर साउथ एशियन स्टडीज (EFSAS) ने आपल्या रिपोर्ट्समध्ये म्हटलंय की,  'पेंगोंग त्सो परिसरातील  फिंगर 2 आणि फिंगर 5 या परिसरातून चिनी सैन्याने माघार घेतली असली तरी काही परिसरात अद्यापही तणाव कायम आहे.

गलवान खोऱ्यात 15 जून रोजी भारत आणि चिनी सैन्यात झालेल्या हिंसक घटनेनंतर दोन्ही देशातील संबंध तणापूर्ण झाले आहेत. कोरोनानंतर अमेरिका आणि चीन यांच्यातील वादही चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. चीन विरुद्ध अमेरिका गट निर्माण करुन दबाव टाकत असताना भारताने आत्मनिर्भरपणे चीनचा सामना करण्यास सज्ज असल्याचा आत्मविश्वास दाखवला आहे. भारताच्या या भूमिकेमुळे चीनची चिंता वाढली आहे, असे मत युरोपियन थिंक टॅकच्या एका अभ्यासातून समोर येत आहे. पूर्व लडाखमधील घटनेनंतर दोन्ही देशांच्या उच्च स्तरीय लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. सकारात्मक चर्चेनंतर चीनने काही भागातील सैन्य मागे हटले असले तरी अद्यापही भारताच्या हद्दीतील काही भागातून चिनी सैन्य मागे हटलेले नाही. देपसांग, गोरा आणि फिंगर परिसरात चिनी सैन्याच्या कुरापती सुरुच असल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोनामुक्त झालेल्या 90 टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसाचा आजार

युरोपीयन फाउंडेशन फॉर साउथ एशियन स्टडीज (EFSAS) ने आपल्या रिपोर्ट्समध्ये म्हटलंय की,  'पेंगोंग त्सो परिसरातील  फिंगर 2 आणि फिंगर 5 या परिसरातून चिनी सैन्याने माघार घेतली असली तरी काही परिसरात अद्यापही तणाव कायम आहे. फिंगर 5 पासून फिंगर 8 पर्यंतच्या परिसरातून चिनी सैन्य पूर्णत: मागे हटत नाही तोपर्यंत आम्ही ठराविक परसरातून सैन्य मागे घेण्यावर विचार करणार नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे.  या रिपोर्टसमध्ये पुढे म्हटलंय की, '2017 मध्ये डोकलामप्रमाणेच ड्रॅगनच्या आक्रमकेतेविरुद्ध भारताकडून राजनैतिक आणि सैन्य नेतृत्वामध्ये ठामपणा दिसत आहे. सैन्य आणि राजकीय कटूनितीसंदर्भात चर्चेतून तोडगा निघत नाही तोपर्यंत दोन्ही देशांतील तणाव कमी होणार नाही, असे संरक्षण मंत्रालयाच्या एका रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आल्याचा दाखलाही या रिपोर्टसमध्ये देण्यात आलाय.

जगातील पहिल्या कोरोना लसीची 12 ऑगस्ट रोजी नोंदणी!

त्यामुळे खूप कठिण परिस्थितीत थंडीच्या दिवसातही लडाख सीमारेषेवर तणाव कायम दिसू शकतो, असेच चित्र सध्याच्या घडीला दिसते.  सियाचिन ग्लेशियरप्रमाणे भारताने सध्याच्या घडीला तणावपूर्ण परिस्थितीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सैन्य सामुग्री आणि इतर रसद एकत्रित केली आहे. त्यामुळे कोणत्याही चीनशी दोन हात करण्यासाठी भारत तयार असल्याचेच दिसून येत आहे, असेही EFSAS ने म्हटले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India confident in standing against China in any future border dispute says EFSAS