SCO Meet : शांघाय सहकार्य परिषदेच्या बैठकीचे पाकिस्तानला आमंत्रण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

india invites pakistan defence minister for sco meet to be held in delhi sources

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ)एप्रिलमध्ये दिल्लीत होणाऱ्या बैठकीसाठी भारताने पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांना आमंत्रण

SCO Meet : शांघाय सहकार्य परिषदेच्या बैठकीचे पाकिस्तानला आमंत्रण

इस्लामाबाद : शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ)एप्रिलमध्ये दिल्लीत होणाऱ्या बैठकीसाठी भारताने पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांना आमंत्रण दिले आहे.एका दैनिकाने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. एससीओचे अध्यक्षपद सध्या भारताकडे आहे. त्यामुळे भारतात विविध बैठका होणार आहेत.

चीन, कझाकस्तान, किर्गीझस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे देश या संघटनेचे इतर सदस्य आहेत. भारत सरकारकडून मंगळवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाला औपचारिक आमंत्रण पाठविण्यात आले असे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. याबाबत भारताकडून तातडीने दुजोरा मिळू शकला नाही.

भारताकडून याआधी पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर आता बंदीयाल यांना आमंत्रण देण्यात आले होते. ते उपस्थित राहिले नव्हते. भारताकडून याशिवाय परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठीही आमंत्रण पाठविण्यात आले आहे. ही बैठक गोव्यात मे महिन्यात होईल. परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो किंवा असिफ यांच्यापैकी भारतातील बैठकांना कोण उपस्थित राहणार याचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचे पाकिस्तान सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :PakistanIndia