India Nepal Relations : भारत आणि नेपाळमधील व्यापार, पर्यटनाला मिळणार नवी चालना; काली नदीवरील ३३ कोटींच्या छारछुम मोटार पुलाचे मोदी-बालेन शाह यांच्या हस्ते लोकार्पण

India Nepal Relations: PM Narendra Modi and PM Balen Shah to Inaugurate Chharchhum Motor Bridge Over Kali River : भारत आणि नेपाळमधील सीमापार दळणवळण, व्यापार आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी उत्तराखंडमधील काली नदीवर छारछुम मोटार पुलाची उभारणी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्या हस्ते पुलाचे आभासी लोकार्पण होणार आहे.
India Nepal Infrastructure Projects

India Nepal Infrastructure Projects


esakal

Updated on: 

पिथौरागढ : भारत आणि नेपाळमधील सीमापार दळणवळण, व्यापार आणि मैत्रीपूर्ण संबंधांना नवी चालना देण्यासाठी उत्तराखंडमधील काली नदीवर उभारण्यात आलेल्या छारछुम आंतरराष्ट्रीय मोटार पुलाचे सोमवारी (२३ नोव्हेंबर) संयुक्तपणे लोकार्पण होणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र (बालेन) शाह यांच्या हस्ते या पुलाचे आभासी लोकार्पण करण्यात येणार आहे.

पिथौरागढ जिल्ह्यातील धारचुला तालुक्याला नेपाळमधील दार्चुला क्षेत्राशी जोडणारा हा पूल सुमारे ३३ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. या लोकार्पणासोबतच चंपावत जिल्ह्यातील बनबसा येथे उभारण्यात आलेल्या ड्राय पोर्टचे उद्घाटनही प्रस्तावित आहे.

Loading content, please wait...