Pakistan admits: मोठी बातमी! अखेर पाकिस्तानला कबूल करावंच लागलं ; 'अमेरिकेच्या मध्यस्थीसाठी कधीच तयार नव्हता भारत'

India Pakistan relations news : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारताने ऑपरेश सिंदूर राबवून पाकिस्तानला अक्षरशा गुडघे टेकायला भाग पाडलं.
Pakistan admits India never accepted US mediation in bilateral disputes, highlighting India’s firm diplomatic stance.

Pakistan admits India never accepted US mediation in bilateral disputes, highlighting India’s firm diplomatic stance.

esakal

Updated on

Pakistan finally admits India never agreed to US mediation : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार संघर्ष उफाळला होता. भारताने ऑपरेश सिंदूर राबवून पाकिस्तानला अक्षरशा हादरवून टाकलं आणि गुडघे टेकायला भाग पाडलं. भारताला शांत करण्यासाठी पाकिस्तानला अक्षरशा विनवण्या कराव्या लागल्या होत्या. हे सगळ्या जगाने बघितलं होतं. मात्र पाकिस्तान उघडपणे कधीच हे कबूल करत नव्हता. 

 शिवाय, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष मिटवण्यासाठी अमेरिकेला मध्यस्थी करावी लागल्याचा, दावाही खुद्द ट्रम्प यांच्याकडून केला गेला. परंतु भारताला हे कधीच मान्य नव्हतं आणि तसा कोणत्याही प्रकारचा पुढाकराही भारताने घेतला नव्हता. उलट पाकिस्तानकडून तसे प्रयत्न झाले होते. भारताची भूमिका आधीपासून कायमच स्पष्ट होती, जी आता पाकिस्ताननेही कबूल केली आहे. 

भारत नेहमीच म्हणतो की पाकिस्तानने युद्धबंदीची विनंती केली होती आणि त्यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका नव्हती. आता पाकिस्तानने स्वतः सत्य स्वीकारले आहे. खुद्द पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी स्वतः हे स्वीकारले आहे, की युद्धबंदीचा प्रस्ताव अमेरिकेमार्फत आला होता, परंतु भारत त्याला सहमत नव्हता.

Pakistan admits India never accepted US mediation in bilateral disputes, highlighting India’s firm diplomatic stance.
UP Dog Life Imprisonment : ऐकावं ते नवलच! आता उत्तर प्रदेशात कुत्र्यालाही होणार जन्मठेप; योगी सरकारचा नवा निर्णय

 एवढंच नाहीतर दार यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी झालेल्या संभाषणाचाही उल्लेखही केला, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की भारत हा द्विपक्षीय मुद्दा मानतो. तसेच, 'पाकिस्तानला कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीबद्दल कधीही कोणतीही अडचण आली नाही. परंतु भारत नेहमीच तो द्विपक्षीय मुद्दा म्हणत आला आहे. मार्को रुबियो यांनी जेव्हा युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला तेव्हा असे म्हटले जात होते की भारतासोबत चर्चा होईल, परंतु नंतर भारताने तो नाकारला.’ असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनीच आता कबूल केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com