जगातील पहिल्या दहा देशांमध्ये भारताला सहावे स्थान

पीटीआय
Tuesday, 27 October 2020

देशातील शिक्षकांचे मूल्यमापन करण्यामध्ये जगातील पहिल्या दहा देशांमध्ये भारताला स्थान असल्याचे ब्रिटनमधील एका संस्थेने केलेल्या जागतिक सर्वेक्षणात दिसून आले आहे. वॅर्की फौंडेशन या संस्थेने हे सर्वेक्षण केले असून ‘रिडिंग बिट्‌विन द लाइन्स : व्हॉट द वर्ल्ड रिअली थिंक्स ऑफ टीचर्स’ या नावाने या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

लंडन - देशातील शिक्षकांचे मूल्यमापन करण्यामध्ये जगातील पहिल्या दहा देशांमध्ये भारताला स्थान असल्याचे ब्रिटनमधील एका संस्थेने केलेल्या जागतिक सर्वेक्षणात दिसून आले आहे. वॅर्की फौंडेशन या संस्थेने हे सर्वेक्षण केले असून ‘रिडिंग बिट्‌विन द लाइन्स : व्हॉट द वर्ल्ड रिअली थिंक्स ऑफ टीचर्स’ या नावाने या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

देशातील शिक्षकांच्या दर्जाबाबत जनतेच्या मनात कोणते सहज विचार आणि मते उमटतात, याबाबत ३५ देशांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावरून तयार केलेल्या यादीमध्ये भारताला सहावे स्थान देण्यात आले आहे. या यादीत चीन, घाना, सिंगापूर, कॅनडा आणि मलेशिया भारताच्या पुढे आहेत. 

अमेरिकन हॉटेलनं हाकललं; अनन्या बिर्लांनी शेअर केला वर्णद्वेषाचा अनुभव

कोरोना संसर्गामुळे जगभरातील जवळपास दीड अब्ज विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयांपासून दूर रहावे लागत आहे. या परिस्थितीमध्ये जगभरातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षक उपलब्ध होण्याची कधी नव्हती इतकी गरज निर्माण झाली आहे, असे मत वॅर्की फौंडेशनचे संस्थापक सनी वॅर्की यांनी व्यक्त केले. या संस्थेने ग्लोबल टीचर स्टेटस निर्देशांकाच्या आधारे प्रत्येक देशातील एक हजार जणांना प्रश्‍न विचारून अहवाल बनविला.

तैवानमुळे वाढली चीनची पोटदुखी

केवळ १४ टक्के निधी
भारतात देशाच्या एकूण तरतूदींच्या १४ टक्के निधी शिक्षणावर खर्च होतो. इटलीत हेच प्रमाण फक्त ८.१ टक्के आहे तर, घाना देशात २२.१ टक्के आहे.  

महाराष्ट्रातील शिक्षकाला संधी
या अहवाला-बरोबरच ग्लोबल टीचर २०२० या पुरस्कारा-साठीची नामांकन यादीही प्रसिद्ध झाली आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील रणजितसिंह दिसले यांचे नावही आहे. मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले असून क्यूआर कोडवर आधारित पुस्तके तयार केली आहेत.

अहवालातील निष्कर्ष

  • श्रीमंत देशांमध्ये शिक्षकांना अधिक सामाजिक मान
  • शिक्षणावर अधिक खर्च करणाऱ्या देशांमध्येही शिक्षकांना मान

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India ranks sixth among the top ten countries in the world