
भारतीय लष्कराने मंगळवारी मध्यरात्री केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची झोप उडालीय. पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानात असलेले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तान भीतीच्या छायेखाली आहे. बिथरलेल्या पाकिस्तानी नेत्यांकडून पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. दरम्यान, बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानने हवाई हल्ल्यांच्या भीतीने लाहोर आणि इस्लामाबादमध्ये एअरस्पेस बंद केली. मंगळवारी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी ४८ तासांसाठी उड्डाणे रद्द केली होती. आता एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला. कराची एअरस्पेस मात्र सुरू आहे.