आधी PoK चा ताबा सोडा; संयुक्त राष्ट्रांसमोर भारताची पाकिस्तानला तंबी!

वृत्तसंस्था
Wednesday, 11 March 2020

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे. याबरोबरच या देशाने आपल्या देशातील नागरिकांमध्ये लोकशाहीचे संस्कार करत लोकशाहीचा जगापुढे आदर्श निर्माण केला आहे.

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने व्याप्त काश्मीर हे पाकिस्तानने भारताचे अवैधरीत्या बळकावलेले क्षेत्र परत करण्याबाबतचा ठराव करून सात दशके उलटूनही त्यांनी अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानने आधी भारताचा काश्मीरचा बळकावलेला भाग सोडावा, असे म्हणत संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचे कान टोचले. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या कायम प्रतिनिधी रुचिता भंडारी यांनी बुधवारी पाकिस्तानच्या बाजूने दहशतवाद्यांना होत असलेली मदत आणि त्यांच्या छुप्या कारवायांचा लेखाजोखाच मांडला. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देताना व्याप्त काश्मीरचा ताबा त्यांनी सोडायला हवा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

- काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले 'ते' नेते सध्या काय करतात?

तसेच, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालाप्रमाणे पाकिस्तानात २५ दहशतवादी संघटना आणि अनेक दहशतवादी सक्रिय असून, यातील काही दहशतवाद्यांनी पाकिस्तानात वारंवार निवडणुकाही लढविल्या आहेत, या गोष्टींना पाकिस्तान कशा प्रकारे नाकारू शकतो,’ असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला.

- Breaking : 'या' दोन बड्या नेत्यांना राज्यसभेचं तिकीट; काकडेंना भाजपचा दणका!​

''भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे. याबरोबरच या देशाने आपल्या देशातील नागरिकांमध्ये लोकशाहीचे संस्कार करत लोकशाहीचा जगापुढे आदर्श निर्माण केला आहे. मात्र, पाकिस्तानमधील जनतेला अजून खऱ्या लोकशाहीचा अनुभव मिळाला नाही,'' अशा शब्दांत भंडारी यांनी पाकचा समाचार घेतला.

- निर्भया प्रकरण : दोषींचा मीडिया इंटरव्ह्यू होणार? तिहार जेल देणार निर्णय!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India stumps Pakistan at UNHRC and asking to withdraw from PoK