गौरवास्पद; भारतीय वंशाच्या महिलेला अमेरिकेत मोठी जबाबदारी  

वृत्तसंस्था
रविवार, 22 डिसेंबर 2019

फेडरल कम्युनिकेशन कमिशन ही संस्था अमेरिकेतील 50 राज्यांतील रेडिओ, टेलिव्हिजन, वायरलेस, सॅटेलाईट आणि केबल असे दूरसंचार  क्षेत्रांवर नियंत्रणाचे काम करते. ही एक स्वतंत्र सरकारी संस्था आहे. दुरसंचार क्षेत्रातील कायदे व नियम लागू करण्यात यांचा मोठा वाटा आहे. 

ह्यूस्टन : भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक डॉ. मोनिषा घोष यांची अमेरिकन सरकारच्या फेडरल कम्युनिकेशन कमिशनमध्ये (अमेरिकन दूरसंचार आयोग) चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (सीटीओ) म्हणून निवड करण्यात आली आहे. या पदावर पोहचणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मोनिषा घोष आपल्या पदाचा कार्यभार 13 जानेवारी 2020 मध्ये स्वीकारणार आहेत. भारतीय वंशाचे अजित पै हे सध्या या कमिशनचे चेअरमन आहेत. मोनिषा घोष त्यांना तांत्रिक आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात सल्लागार म्हणून मदत करणार आहेत. 

...म्हणून प्रज्ञासिंह ठाकूर यांची स्पाईसजेटविरोधात तक्रार

फेडरल कम्युनिकेशन कमिशन ही संस्था अमेरिकेतील 50 राज्यांतील रेडिओ, टेलिव्हिजन, वायरलेस, सॅटेलाईट आणि केबल असे दूरसंचार  क्षेत्रांवर नियंत्रणाचे काम करते. ही एक स्वतंत्र सरकारी संस्था आहे. दुरसंचार क्षेत्रातील कायदे व नियम लागू करण्यात यांचा मोठा वाटा आहे. 

सोनिया गांधी म्हणाल्या, 'हे' दोन्ही चव्हाण मंत्रिमंडळात नको! 

कोण आहेत मोनिषा घोष?
मोनिषा घोष या भारतीय वंशाच्या असून, सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत. त्यांनी 1986 मध्ये आयआयटी खरगपूर येथील बी. टेकचे शिक्षण घेतले. त्यानंतर 1991 मध्ये कॅनिफोर्नियातील विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यांनी यापूर्वी नॅशनल सायन्स फेडरशनमध्ये कॉम्प्युटर नेटवर्क डिव्हिजनमध्ये प्रोग्राम डायरेक्टर म्हणून काम केले आहे. तसेच त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमध्ये रिसर्च प्रोफेसर म्हणूनही काम केले आहे. वायरलेस टेक्नॉलॉजीमध्ये त्यांचे प्राविण्य असून, इंटरनेट ऑफ थिंग्ज, 5 जी आणि मॉडर्न वाय-फाय सिस्टीममध्ये त्यांचे संशोधन आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian American Dr Monisha Ghosh 1st woman Chief Technology Officer of US' communications commission